आपल्या देशात क्रिकेट चे अनेक फॅन्स आहेत. इतर खेळापेक्षा आपल्या देशात क्रिकेट चे जास्त चाहते आहेत. आपल्या मते आपल्या देशात सर्वात पैसा हा क्रिकेट आणि बॉलिवूड मध्ये आहे. सामान्य माणसापेक्षा क्रिकेटर आणि बॉलिवूड मधील जीवनशैली ही अत्यंत वेगळीच आहे.

बऱ्याच वेळा सोशल मीडियावर अनेक बातम्या आपणाला दिसतात की बऱ्यापैकी क्रिकेट लोकांचे अफेअर्स हे बॉलिवूड अभिनेत्री बरोबर आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला भारतीय तुफानी फलंदाज इशान किशन च्या खाजगी आयुष्यबद्दल सांगणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध विकेटकिपर इशान किशन चे अनेक चाहते आहेत. तसेच ईशान किशन हा एक आक्रमक फलंदाज सुद्धा आहे. ईशान किशन वर लाखो मुली फिदा आहेत. परंतु ईशान मात्र एकाच मुलीवर फिदा आहे.
इशान किशनच्या गर्लफ्रेंड चे नाव हे अदिती हुंडिया असून ती दिसायला अती सुंदर आहे. अदिती ही एक प्रोफेशनल मॉडेल आहे, ती 2017 मध्ये मिस इंडियाची फायनलिस्ट देखील होती.
2018 साली अदितीने मिस सुपरनॅशनल इंडियाचा ताजही जिंकला होता. अदितीचे स्वतःचे कपडे ब्रँड लेबल अदिती हुंडिया देखील आहे. आदिती ही 25 वर्षांची असून तिचे इंस्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अदिती हुंडिया सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. त्याच्या शैलीचे लाखो चाहते आहेत. तसेच सोशल मीडियावर आदिती प्रसिद्ध सुद्धा आहे.
अदिती हुंडिया कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करते, ती सर्व प्रकारच्या लूकमध्ये अती सुंदर दिसते आणि कदाचित क्रिकेटर इशान किशन देखील तिच्यावर फिदा झालेला आहे.