Ishan Kishan likely to Announce Retirement? ईशान किशन अचानक जाहीर करणार निवृत्ती? बीसीसीआय देत नाहीये कमबॅकची संधी, लावले धक्कादायक आरोप.

0

Ishan Kishan likely to Announce Retirement: टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन मागच्या अनेक दिवसांपासून भारतीय संघातून तसेच मैदानाबाहेर फिरत आहे. तो शेवटचा भारतीय संघात 2023 मध्ये नोव्हेंबरमध्ये दिसला होता. तेव्हापासून तो बाहेरच फिरत होता.

बीसीसीआयने त्याला २०२४ च्या टी२० विश्वचषकातही पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. निवडकर्त्यांनी झिम्बाब्वे दौऱ्यावरही इशानचा समावेश केला नाही. ज्यानंतर किशन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा (Ishan Kishan likely to Announce Retirement) करू शकतो, असे वृत्त समोर येत आहे.

ishan kishan- yuvakatta news

Ishan Kishan likely to Announce Retirement: इशान किशन  खरचनिवृत्त होऊ शकतो का?

ईशान किशन सध्या बीसीसीआयच्या निशाण्यावर आहे. त्याला संघात संधी दिली जात नाही. एवढेच नव्हे तर वार्षिक करारातूनही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता त्यांच्या निवृत्तीची अफवा शिगेला पोहोचली आहे. ईशान किशन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, अशा अनेक बातम्या मीडियामध्ये आल्या आहेत.

त्याला भारतात संधी न मिळाल्यास तो अमेरिका, नेपाळ, आयर्लंड किंवा झिम्बाब्वेसारख्या संघांकडे वळू शकतो. याआधी उन्मुक्त चंदसारखे अनेक खेळाडू आहेत जे इतर देशांसाठी क्रिकेट खेळत आहेत. कारण सध्याच्या काळात त्यांचे पुनरागमन दिसत नाही. संघ आधीच यष्टिरक्षक फलंदाजांनी भरलेला आहे,ज्यामुळे ईशान इतर संघाकडून खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटर म्हणून खेळण्याचा राजीनामा देऊ शकतो, असे म्हटले जाते.

ईशानची बुडती कारकीर्द फक्त हार्दिकच वाचवू शकतो.

रोहित शर्माने T20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्यानंतर आता या फॉरमॅटची सत्ता हार्दिक पांड्याच्या हाती येणार आहे.
पांड्याला भारताचा पुढील कर्णधार घोषित केले जाऊ शकते. तर इशान किशनचे हार्दिकसोबत चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत किशनची बुडत चाललेली कारकीर्द केवळ पांड्याच त्याच्या कर्णधारपदाखाली वाचवू शकतो. इशानचा संघात समावेश करण्याची त्याने निवडकर्त्यांकडे मागणी केल्यास तो परत येऊ शकतो. अन्यथा टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झालेले दिसत आहेत.

मानसिक ताणतणावाचे निमित्त इशान किशनला महागात पडले

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी ईशान किशनने मानसिक थकव्याचे कारण देत बीसीसीआयमधून सुट्टी घेतली होती.
यानंतर तो मस्ती करताना दिसला. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता.

Ishan Kishan likely to Announce Retirement? ईशान किशन अचानक जाहीर करणार निवृत्ती? बीसीसीआय देत नाहीये कमबॅकची संधी, लावले धक्कादायक आरोप.
ज्याला किशनने साफ नकार दिला, त्यानंतर त्याची प्रतिमा बीसीसीआयच्या नजरेत नकारात्मक झाली.त्यामुळे टीम इंडियातून बाहेर पडण्याचे मोठे परिणाम त्याला भोगावे लागले आहेत. आता लवकरच ईशान किशनला भारतीय  संघात संधी न दिल्यास तो निवृत्ती जाहीर करण्याचा विचार देखील करू शकतो, असे म्हटले जात आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.


 

Leave A Reply

Your email address will not be published.