टीम इंडियाच्या या खेळाडूवर तर संजू सॅमसनपेक्षा जास्त होतोय अन्याय, रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून एकदाही देत नाहीये खेळण्याची संधी..
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला शेजारील देशाकडून 1 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात सुद्धा भारतीय संघ विजयी होण्यास अपयशी ठरला.
३ सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशी संघ 2 -0 ने आघाडीवर आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. या पराभवामुळे उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून झालेल्या दारूण पराभवाच्या आठवणी ताज्या झाल्या. खराब फलंदाजीनंतर भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या कौशल्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
View this post on Instagram
पण, भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे प्रतिभेची कमतरता नाही. ज्याने प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे. असे असतानाही त्याचा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय संघात एक सलामीवीर फलंदाज देखील आहे ज्याचा फॉर्म सध्या चांगला आहे. शिखर धवनच्या जागी कर्णधार रोहित शर्मा कोणाला संघात खेळण्याची संधी देऊ शकतो. संजू सॅमसन हा जरी एक पर्याय असला तरीसुद्धा आणखी एक असा खेळाडू आहे ज्याला गेल्या अनेक दिवसापासून भारतीय संघात संधी दिली गेली नाहीये.
टीम इंडियाचा सलामीचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन हा त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक 93 धावांची खेळी केली. मात्र, यादरम्यान त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक हुकले. त्याची चमकदार कामगिरी पाहून त्याला बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा सर्वांना होती.
पण, कर्णधार रोहित शर्माने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि प्लेईंग 11 मध्ये अनुभवी शिखर धवनला संधी दिली.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत शिखर धवनची कामगिरी लाजिरवाणी होती. बांगलादेशातही त्याचा खराब फॉर्म कायम राहिला. 4 डिसेंबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धवनने 17 चेंडूत केवळ 7 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याच्या खराब फॉर्मची चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी त्याच्या जागी ईशान किशनला संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
इशान किशनची क्रिकेट कारकीर्द
वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जाणारा डावखुरा स्फोटक फलंदाज इशान किशन त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण सामना खेळला होता. किशनने 9 सामन्यांच्या 8 डावात 267 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या ९३ धावा होती. त्याचबरोबर त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतकंही झळकली आहेत. त्याने आपला शेवटचा सामना ऑक्टोबर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
हेही वाचा: