“माझ्या मते या खेळाडूला ऑस्ट्रेलियाविरुद्ध रिषभच्या जागी संधी द्यायला हवी” माजी खेळाडू आकाश चोप्राने केला मोठा खुलासा..
टीम इंडिया काही दिवसांत न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका संपवणार आहे, या मालिकेनंतर भारतीय संघ नव्या प्रवासाला जाण्यासाठी सज्ज होईल. भारताचा प्रवास 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या रूपाने सुरू होईल, त्यानंतर टीम इंडियाचा WTC मधील मार्ग निश्चित होईल.
त्याचवेळी टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघातून यष्टीरक्षक फलंदाजाचा शोध सुरू केला आहे आणि याचदरम्यान माजी खेळाडू आकाश चोप्राने त्यांच्या मते कोणाला संधी दिली पाहिजे,याचा खुलासा केला आहे.
ईशान की भरत? आकाश चोप्राचा आवडता कोण आहे.

टीम इंडियाकडे केएल राहुलच्या रूपाने यष्टिरक्षक आहे पण फलंदाजीची सलामी दिल्यानंतर तो विकेटकीपिंग करू शकणार नाही. म्हणूनच टीम इंडियाच्या यष्टीरक्षणासाठी ऋषभ पंतची नेहमीच निवड केली जाते, परंतु 2022 च्या शेवटी, पंत एका कार अपघातात गंभीर जखमी झाला आणि बऱ्याच काळापर्यंत संघाबाहेर राहणार आहे. आता भारतीय संघाकडे यष्टीरक्षक ठेवण्यासाठी दोन पर्याय आहेत, त्यापैकी एक युवा यष्टिरक्षक इशान किशन आणि दुसरा केएस भरत.
या मुद्द्यावर बोलताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला, “यावेळी ऋषभ पंत आमच्यासोबत उपलब्ध नाही हे खरोखरच दुर्दैवी आहे. तो असा खेळाडू आहे जो सर्व फॉरमॅटमध्ये खेळू शकतो. मला वाटते की आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहू. आकाश चोप्रा म्हणाला की, केएस भरत आणि इशान किशन हे दोघेही कसोटी क्रिकेटचे दावेदार आहेत.
आकाश चोप्राने दोघांबद्दल आपले मत सांगितले.
आकाश चोप्राने दोन्ही खेळाडूंबद्दल आपले मत मांडले की दोघांमध्ये भिन्न क्षमता आहेत आणि दोघेही टीम इंडियासाठी आवश्यक आहेत परंतु दोघेही एकत्र खेळू शकत नाहीत, तो पुढे म्हणाला, “जर तुम्हाला अधिक चांगल्या रक्षकाची गरज असेल तर के.एस. स्फोटक डावखुरा फलंदाज आमच्याकडे वरच्या ऑर्डरमध्ये लेफ्टी नसल्यामुळे मी म्हणेन की ईशान किशन चांगला पर्याय ठरू शकेल. म्हणूनच रिषभच्या अनुपास्थितीत भारतीय संघाने ऑस्ट्रोलियाविरुद्ध ईशान किशनला संधी दिलेलं मला पहायचं आहे.
Winning start 🇮🇳 Special, special innings today @ShubmanGill 💥💪 Well played brother ❤️❤️👏 pic.twitter.com/VxRBupxlE0
— Ishan Kishan (@ishankishan51) January 18, 2023
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “वैयक्तिकरित्या,किशनला माझे प्राधान्य असेल कारण, तो कसोटीत धावफलक हलता ठेवू शकतो आणि आम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे जो विकेट्सच्या मागे रविचंद्रन अश्विन आणि जडेजा यांच्या गोलंदाजीला हाताळू शकेल.”
आता किवी संघासोबतची मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियासोबत 4 कसोटी सामन्यांची मालिका होणार असून यष्टीरक्षक ऋषभ पंत संघासोबत नाही, त्यामुळे संघ व्यवस्थापन आकाशच्या या वक्तव्याला किती गांभीर्याने घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या दोघांपैकी कोणाला संधी मिळेल,हे आता येणारा काळच ठरवेल..
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..