या कारणामुळे राहुल द्रविडने सांगितलेले काम न करता ईशान किशन हार्दिक पांड्यासोबत करतोय आयपीएलची तयारी, टीम इंडियातील स्थान जाण्याची शक्यता..

0

ईशान किशन:  भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन सध्या त्याच्या वागण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आधी त्याला त्याच्या वागणुकीमुळे भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही नंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही टीम इंडियासोबत वाद झाला होता. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन या दौऱ्यावरून अचानक परतला आणि तेव्हापासून तो भारतीय संघाबाहेर आहे.

टीम इंडियाचे व्यवस्थापन आणि इशान किशन यांच्यात सर्व काही चांगले दिसत नव्हते आणि दरम्यान, प्रशिक्षक राहुल द्रविडनेही इशान किशनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, या सर्व अंदाजांव्यतिरिक्त, ईशान किशनबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

आयपीएल लेटेस्ट न्यूज  रिपोर्टनुसार, इशान किशन सध्या बडोद्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्यासोबत सराव करत आहे. आयपीएल सीझन सुरू होण्यापूर्वी इशान किशन तिथे सराव करत आहे , मात्र त्याने याबाबत कोणालाच माहिती दिलेली नाही.

या कारणामुळे राहुल द्रविडने सांगितलेले काम न करता ईशान किशन हार्दिक पांड्यासोबत करतोय आयपीएलची तयारी, टीम इंडियातील स्थान जाण्याची शक्यता..

ईशानव किशनवर काय म्हणाला राहुल द्रविड?

खरं तर, टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असे राहुल द्रविडने सांगितले होते, त्यानंतर इशान किशन रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये दिसला नाही. संघाने विचारल्यानंतरही इशान किशन खेळापासून दूर राहिला, दरम्यान, इशान किशनचे पुनरागमन केवळ त्याच्यावरच अवलंबून असल्याचे द्रविडने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत इशान किशनच्या वृत्तीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते.

दरम्यान, इशान किशन बडोद्यातील किरण मोरे अकादमीमध्ये सराव करत असून पांड्या बंधूंसोबत आयपीएलची तयारी करत असल्याचे वृत्त आयपीएल लेटेस्ट न्यूज ने दिले आहे. इशान किशनने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून एकही सामना खेळलेला नाही, तो विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात टीम इंडियाचा भाग होता, त्यानंतर तो संघात खेळू शकला नाही.

कारीकीर्दीच्या सुरवातीच्या काळात आयपीएलच्या लिलावात विकल्या गेले नव्हते हे 3 स्टार खेळाडू, आज आहेत आयपीएलचे बादशहा..

ईशान किशनच्या वागणुकीमुळे बीसीसीआयच्या करारातून कटणार त्याचा पत्ता?

इशान किशन रणजी संघाकडून खेळण्यास वारंवार नकार देत आहे, अशा परिस्थितीत आता बीसीसीआय त्याला आपल्या कराराचा भाग बनवणार की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण तो बराच काळ संघापासून दूर आहे आणि देशांतर्गत क्रिकेटकडेही लक्ष देत नाही. सध्या इशान किशन टीम इंडियाच्या केंद्रीय कराराच्या सी (C) श्रेणीमध्ये आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave A Reply

Your email address will not be published.