बांग्लादेशी गोलंदाजांना फोडून काढत ईशान किशनने ठोकले ताबडतोब शतक, ४ मोठे विक्रम मोडून करतोय द्विशतकाकडे वाटचाल..!
भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ सामन्याची एकदिवशीय मालीका सुरु आहे.बांगलादेशी संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती. अशा स्थितीत हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, विजयाची नोंद करून क्लीन स्वीप टाळायचा आहे. दुखापतीमुळे नियमित कर्णधार रोहित शर्मा, कुलदीप सेन आणि दीपक चहर या सामन्यातून बाहेर पडले आहेत. रोहितच्या बाहेर पडल्यामुळे केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे.
इशान किशन आणि शिखर धवन यांनी बांगलादेशविरुद्ध भारताच्या डावाची सुरुवात केली पण पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मेहदी हसन मिराझने शिखर धवनला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर विराट कोहली फलंदाजीस आला.

त्यावेळी इशान किशन 11 धावा करून खेळत होता आणि भारताची धावसंख्या 15 धावांवर होती. सावध खेळ करत इशान किशनने 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 24व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केले.
तत्पूर्वी, शनिवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वनडेत बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने ही तीन सामन्यांची वनडे मालिका आधीच जिंकली आहे. बुधवारी यजमान बांगलादेश संघाने भारताचा पाच धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली.
चितगाव येथे खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यासाठी बांगलादेशने आपल्या संघात दोन बदल केले आहेत.
ईशान किशन करतोय जबरदस्त फलंदाजी..
आपले शतक पूर्ण केल्यानंतर ईशान किशनने स्ट्राईक रेट वाढवला आहे. सध्या किशन 100 चेंडूत १४७ धावांवर खेळत आहेत. त्याची फलंदाजी पाहता बांग्लादेशच्या गोलंदाजांनाही घाम फुटला असावा. आपल्या या खेळीत किशन आतापर्यंत 7 चौके आणि 4 षटकार ठोकून बसला आहे. अशीच फलंदाजी करत रहिला तर किशन आपल्या करिअर मधील पहिले द्विशतक ठोकू शकतो.
शतक ठोकताच सोशल मिडीयावर आला अभिनंदनाचा पूर..
There's no stopping Ishan Kishan in Chattogram 💥💥
📸: Sony Liv pic.twitter.com/6evy2tWALH
— CricTracker (@Cricketracker) December 10, 2022
Ishan Kishan now has the record of FASTEST 150 in odi under his name . This boy is special and should be given more chances to prove his potential ❤️ pic.twitter.com/hvMWTY5VkG
— Yashvi. (@BreatheKohli) December 10, 2022
We go again 🤙 pic.twitter.com/leCzTOgpI6
— Ishan Kishan (@ishankishan51) December 2, 2022
The hug from Virat Kohli when Ishan Kishan completed his maiden ODI Hundred. pic.twitter.com/Fe5TUpELzV
— CricketMAN2 (@ImTanujSingh) December 10, 2022
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
व्हिडीओ प्लेलीस्ट :