ईशांत शर्माच्या भन्नाट यॉर्कर चेंडूवर आंद्रे रसेल चारी मुंड्या चीत, अशी होती फलंदाजाची रिएक्शन; पहा वायरल व्हिडिओ

0

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बुधवारी आयपीएल 2024 मधला सोळावा सामना झाला. या सामन्यात वेगवान गोलंदाज ईशान शर्मा हा दिल्लीकडून सर्वात घातक गोलंदाजी करताना दिसून आला. आंद्रे रसेल याला टाकलेला एक यॉर्कर चेंडू इतका खतरनाक होता की, फलंदाजाच्या यष्टया गुल केल्या, शिवाय चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना फलंदाजही खेळपट्टीवर कोसळला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड बाहेर होत आहे. तसेच सर्वत्र ईशांत शर्मा याने टाकलेल्या चेंडूची चर्चा होत आहे.ईशांत शर्माच्या भन्नाट यॉर्कर चेंडूवर आंद्रे रसेल चारी मुंड्या चीत, अशी होती फलंदाजाची रिएक्शन; पहा वायरल व्हिडिओ

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकत्ताने दमदार प्रदर्शन केले. त्यांनी वीस षटकात सात बाद 272 इतक्या डोंगराएवढ्या धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी दुसरी धावसंख्या आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पॅट कमीन्सच्या संघाने 277 धावांचा डोंगर रचला.

कोलकाताच्या डावातील विसावे षटक टाकण्यासाठी इशांत शर्मा गोलंदाजीत आला त्याने इतकी घातक गोलंदाजी केली की, पहिल्याच यॉर्कर चेंडूवर रसेल याला चारी मुंड्या चित केले. त्याला स्वतःचे संतुलन राखता आला नाही तो खेळपट्टीवर खाली कोसळला. त्याला चेंडू समजला नसल्याने तो त्रिफळाचीच झाला. त्यानंतर उठून उभे राहून पॅवेलियनमध्ये परत जाताना ईशात शर्माचे कौतुक करत माघारी गेला. त्याने 19 चेंडू चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर ईशांतने रमनदीप याला बाद केले. तो केवळ दोन धावा करू शकला.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 मधील 16व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकात 272 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर दिल्लीच्या टीमने 17.2 शतकात 166 धावांवर सर्वबाद झाला. यंदाच्या हंगामातला हा दिल्लीचा चार सामन्यातील तिसरा पराभव आहे. कोलकाताच्या संघाने विजयाची हॅट्रिक लगावली. केकेआरने तिन्ही सामने जिंकले आहेत.

DC VS KKR: कोलकत्ताची  गुणतालिमध्ये पहिल्या स्थानावर झेप.

या विजयासह कोलकत्ताने सहा गुण मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली तर दिल्ली नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्या खात्यात केवळ दोन गुणांची भर आहे. कोलकत्याचा पुढचा सामना 8 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चेन्नई येथे होणार आहे. तर दिल्लीचा पुढचा सामना 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave A Reply

Your email address will not be published.