DC vs PBKS: दिल्ली कॅपिटल्स ला बसला मोठा झटका, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा जखमी; संपूर्ण हंगामातून होऊ शकतो बाहेर?

दिल्ली कॅपिटल्स ला बसला मोठा झटका: वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा जखमी,संपूर्ण हंगामातून होउ शकतो बाहेर?

DC vs PBKS:  आयपीएल 2024 च्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स  (DC vs PBKS) या संघामध्ये सामना झाला. दिल्लीच्या या पहिल्या सामन्यात महत्त्वपूर्ण वेगवान गोलंदाज जखमी झाल्याने त्यांना मोठा झटका बसला आहे. महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मुल्लांपुर येथे झालेल्या सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याचा पाय मूडपल्याने दुखापत झाली आहे. त्यामुळे शर्माला सामना अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले.

DC vs PBKS: चालू सामन्यात इशांत शर्मा पडला मैदानातून बाहेर.

भारताच्या या वेगवान गोलंदाजाने पंजाब किंग्स संघाचे सुरुवातीचे दोन विकेट घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्यांदा कर्णधार शिखर धवन याला 22 धावांवर आउट केले तर, फॉलो थ्रू मध्ये जॉनी बेयरस्टोला (9) धावबाद केले. हे दोन्ही विकेट त्याने एकाच षटकात घेऊन पंजाबला बॅकफूटवर ढकलले.

ईशांत शर्माने मिड विकेटवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याचा डावा पाय मोडपला गेल्याने तो वेदनेने कळवळून जमिनीवर कोसळला. त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे टीम मैदानात उतरली. टीमचे फिजोने तपासणी केल्यानंतर त्याला मैदाना बाहेर घेऊन गेले.

दिल्लीचा संघ एक वेगवान गोलंदाज कमी घेऊन खेळत होता कारण फिरकीपटू रिकी भुईच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अभिषेक परेल याला संघात घेतले होते.

सॅम करन याच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर आणि लियाम लिविंगस्टोन (नाबाद 38) याने पाचव्या विकेटसाठी केलेल्या 67 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर पंजाबने दिल्लीवर शानदार विजय मिळवला. शनिवारी झालेल्या या सामन्यात चार चेंडू आणि चार विकेट ठेवून पंजाबने दिल्लीचा पराभव केला.

दिल्ली कॅपिटल्स ला बसला मोठा झटका: वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा जखमी,संपूर्ण हंगामातून होउ शकतो बाहेर?

दिल्ली कॅपिटल्सचा मधल्या फळीतील फलंदाज अभिषेक परेल याने 10 चेंडूत नाबाद 32 धावांची तुफानी खेळी केली. या आक्रमक खेळीच्या जोरावर दिल्लीने 20 षटकात नऊ बाद 174 धावा केल्या. प्रतिउत्तरात पंजाबच्या टीमने चडाकेबाज फलंदाजी करत दिल्लीला चोख उत्तर दिले. पंजाबने 19.2 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा करत स्पर्धेतला पहिला विजय मिळवला.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता