अय्यरने वनडे क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण करत नवज्योत सिंग सिद्धू आणि सौरभ गांगुलीला टाकले पाठीमागे

IND vs SL: श्रेयस अय्यरने मोडला 40 वर्षापूर्वीचा विक्रम, विश्वचषकात अशी कामगिरी करणारा 5 वा भारतीय फलंदाज...

भारत आणि श्रीलंका यांच्यात आयसीसी विश्वचषक स्पर्धेतला 33 वा सामना सुरू आहे. या सामन्यात खराब फॉर्मत असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने मुंबईचे मैदान दणाणून सोडले. अय्यरने श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात वनडे क्रिकेट मध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. भारताकडून सर्वात कमी डावांमध्ये 2000 हजार धावा पूर्ण करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी डावा 2000 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम हा गिलच्या नावावर आहे.

 

श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात श्रेयश अय्यरने 56 चेंडूत 82 धावांची धमाकेदार खेळी केली. तीन चौकार आणि सहा उत्तुंग षटकारासह हे लक्षवेधक अर्धशतकी खेळी केली. चौफेर फटकेबाजी करत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. कमी डावात 2000 हजार धावा पूर्ण करण्याच्या विक्रमात त्याने नवज्योत सिंग सिद्धू आणि सौरव गांगुली यांना पाठीमागे टाकले. या दोघांनी प्रत्येकी 52 वनडे सामन्यात 2000 धावा केल्या होत्या. भारताकडून शिखर धवन याने 48 वनडे सामन्यात 2000 केल्या तर 2000 धावा पूर्ण करण्यासाठी श्रेयस अय्यरला 49 सामने खेळावे लागले.

 

वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात करत रोहित शर्माला अवघ्या चार धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर गिल आणि कोहली यांनी भारताचा डाव सांभाळला दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. गिल 92 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने आपली विकेट गमावली आजही त्याला शतक पूर्ण करता आले नाही. तो 94 चेंडूत 88 धावा काढून बाद झाला. यात 11 चौकारांचा समावेश होता.