6,4,6,4,6,6….. 21 वर्षाच्या ‘या’ खेळाडूने मोडला एबी डिव्हीलीअर्सचा विक्रम, एकदिवशीय सामन्यात ढोकले सर्वांत कमी चेंडूत शतक..
एकीकडे २०२३ चा विश्वचषक भारतात खेळला जात असताना, सध्या ऑस्ट्रेलियात देशांतर्गत ५० षटकांचा वनडे चषक खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्या या एकदिवसीय चषकात 8 ऑक्टोबर रोजी दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया यांच्यात शानदार सामना खेळवला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तस्मानियाने 435 धावा केल्या.
प्रत्युत्तर म्हणून दक्षिण ऑस्ट्रेलियाने जोरदार फटकेबाजी केली. दक्षिण ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क याने वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडला आहे. एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडून त्याने ही कामगिरी केली आहे.चला जाणून घेऊया अगदी सविस्तर..
जेक फ्रेझर-मॅकगर्कने मोडला एबी डिव्हिलियर्सचा विक्रम, ठोकले एकदिवशीय सामन्यातील सर्वांत जलद शतक.
आज विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. याच दिवशी ऑस्ट्रेलियात देशांतर्गत एकदिवसीय चषक खेळला जात आहे. ज्यामध्ये तस्मानिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. तस्मानियाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 गडी गमावून 435 धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्क वेगळ्याच मूडमध्ये होता.
काही वेळातच त्याने अवघ्या काही षटकांत शतक झळकावले आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्कने लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावून एक नवा विश्वविक्रम रचला. त्याने अवघ्या 29 चेंडूत शतक झळकावून हा विक्रम केला. त्याने 6 चौकार आणि 12 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ही कामगिरी केली. बाद होण्यापूर्वी त्याने 38 चेंडूत 328.95 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 10 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने 128 धावांचे शानदार शतक झळकावले.
स्टीव्ह स्मिथला आपला गुरू मानतो जेक फ्रेझर-मॅकगर्क!
21 वर्षीय जेक फ्रेजर-मॅकगुर्कने ऑस्ट्रेलियाकडून 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकही खेळला आहे. यासोबतच तो बिग बॅशमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळतो. तिथेही त्यांनी स्वत:चे चांगले नाव कमावले होते. जेक फ्रेझर-मॅकगर्कबद्दल असे म्हटले जाते की तो महान ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला आपला गुरू मानतो. त्याची फलंदाजीची शैलीही हुबेहुब स्टीव्ह स्मिथसारखी आहे.
एबी डिव्हिलियर्सने 31 चेंडूत शतक झळकावले होते.
जेक फ्रेझर-मॅकगर्कने 29 चेंडूत शतक झळकावून लिस्ट ए क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला. जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. 2015 विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना त्याने 31 चेंडूत शतक पूर्ण केले होते. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर ‘हा’ अजूनही एक विश्वविक्रम आहे.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..