इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ‘जेम्स अँडरसन’ बनला लाल चेंडूचा नवा बादशाह; अशी कामगिरी करणारा बनला पहिला वेगवान गोलंदाज..!

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन' बनला लाल चेंडूचा नवा बादशाह; अशी कामगिरी करणारा बनला पहिला वेगवान गोलंदाज..!

जेम्स अँडरसन 700 विकेट्स:  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने कसोटी क्रिकेट मधील 700 विकेट पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. धर्मशाळा येथे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यांमध्ये अँडरसनला 700 विकेट घेण्यासाठी दोन विकेटची गरज होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवला बाद करून त्याने हा नवा इतिहास घडवला.

जेम्स अँडरसनने पूर्ण केल्या कसोटीमध्ये 700 विकेट्स..

जीमीने 187 कसोटी सामन्यात 700 विकेट पूर्ण केले.700 विकेट घेणारा तो तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी हा पराक्रम श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथ्यया मुरलीधरन (800)आणि ऑस्ट्रेलियाचा माजी दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न (708) यांनी हा पराक्रम केला होता.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन' बनला लाल चेंडूचा नवा बादशाह; अशी कामगिरी करणारा बनला पहिला वेगवान गोलंदाज..!

अँडरसन याचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड याने टेस्ट क्रिकेटमध्ये 600 गडी बाद केले होते. मागील वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून त्याने निवृत्ती घेतली होती. त्याच्या नावावर 604 विकेटची नोंद आहे. ब्रॉड आणि अँडरसन पूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्रा याच्या नावावर 563 बळीची नोंद आहे.

रेड बॉल क्रिकेटच्या इतिहासात अँडरसनने 32 वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. या फॉरमॅटमध्ये अँडरसनपेक्षा केवळ मुरलीधरन (67), वॉर्न (37), सर रिचर्ड हॅडली (36), अनिल कुंबळे (35), रविचंद्रन अश्विन (35) आणि रंगना हेराथ (34) यांनी पाच बळी घेतले आहेत. हॅडलीनंतर एका डावात 30 हून अधिक पंच मारणारा अँडरसन हा दुसरा वेगवान गोलंदाज आहे.

41 वर्षे जिमीने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हापासून तो इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाची धुरा सांभाळत आहे. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेट पासून दूर राहिले. तेव्हापासून तो कसोटी क्रिकेटमध्ये रोज नव्या विक्रमाला गवसणी घालत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by James Anderson (@jimmya9)

2020 मध्ये पाकिस्तान विरुद्ध एजिस बाउल येथे तिसऱ्या कसोटीत जिमीने त्याचा 600 वा कसोटी बळी घेतला. त्या सामन्याच्या एका डावात त्याने पाच विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसनला आता शेन वॉर्नरचा सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम खुणावत आहे. या विक्रमांपासून तो खूप दूर नाही. गेल्या 21 वर्षापासून जागतिक क्रिकेटमध्ये अधिराज्य करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाला मात्र भारत त्याविरुद्धच्या मालिकेत फारसे यश लाभले नाही. त्याला संपूर्ण मालिकेत बारा गडी बाद करता आले.

तसेच जेम्स अँडरसन याला सर्वाधिक कसोटी खेळण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढण्यासाठी अजून १४ कसोटी सामने खेळावे लागणार आहे.  सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 200 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला आहे. सचिनचा हा विक्रम जिमीने मोडल्यास अशी कामगिरी करणारा सचिन नंतर दुसरा खेळाडू ठरेल.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन' बनला लाल चेंडूचा नवा बादशाह; अशी कामगिरी करणारा बनला पहिला वेगवान गोलंदाज..!

41 वर्षीय इंग्लिश वेगवान गोलंदाजाचे कसोटी बळी .

100वी विकेट: जॅक कॅलिस

200वी विकेट: पीटर सिडल

300वी विकेट: पीटर फुल्टन

400वी विकेट: मार्टिन गुप्टिल

500वी विकेट: क्रेग ब्रॅथवेट

600वी विकेट: अझलीक

700वी विकेट : कुलदीप यादव.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

– रन मशीन विराट कोहलीची अशी आहे आयपीएल मधील क्रिकेट कारकीर्द! वाचा डेब्यू सामन्यात किती काढल्या होत्या धावा?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *