41 वर्षाच्या जेम्स अँडरसनने हवेत सूर मारत घेतला एवढा जबरदस्त झेल की, स्वतः कर्णधार रोहित शर्माही झाली चकित; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!

41 वर्षाच्या जेम्स अँडरसनने हवेत सूर मारत घेतला एवढा जबरदस्त झेल की, स्वतः कर्णधार रोहित शर्माही झाली चकित; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने वयाच्या 41 व्या वर्षी 21 वर्षीय तरुणाचा उत्साह दाखवला आहे. भारत विरुद्ध रांची येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जेम्स अँडरसनने हवेत झेप घेत टीम इंडियाचा फलंदाज यशस्वी जैस्वालचा आश्चर्यकारक झेल घेतला. जेम्स अँडरसनने ज्या पद्धतीने हा झेल घेतला ते पाहून प्रेक्षक आणि समालोचकही आश्चर्यचकित झाले. यशस्वी जयस्वालचा हा झेल घेताना जेम्स अँडरसनची बांधिलकी पाहण्यासारखी होती.

अँडरसनने हवेत उडी मारत घेतला आश्चर्यकारक झेल!

41 वर्षाच्या जेम्स अँडरसनने हवेत सूर मारत घेतला एवढा जबरदस्त झेल की, स्वतः कर्णधार रोहित शर्माही झाली चकित; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!

भारतीय डावाच्या 18व्या षटकात जो रूट इंग्लंडसाठी गोलंदाजी करण्यासाठी आला होता. जो रुटच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने शॉट खेळला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या जेम्स अँडरसनने हवेत उडी घेत उत्कृष्ट शैलीत झेल घेतला. जेम्स अँडरसनचा झेल पाहिल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मादेखील चकित झाला. दुसरीकडे, यशस्वी जैस्वालला निराश व्हावे लागले. यशस्वी जैस्वाल 37 धावा करून बाद झाली.

IND vs ENG: रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास..! अनिल कुंबळेचा हा मोठा विक्रम मोडून काढत केली अनोखी कामगिरी..!

यशस्वी जैस्वाल 37 धावा करून बाद.

यशस्वी जैस्वालच्या ३७ धावांच्या खेळीत ५ चौकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी यशस्वी जैस्वालने रोहित शर्मासह पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली होती. इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावांवर आटोपला. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जॅक क्रॉलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. टीम इंडियाकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक ५ बळी घेतले. कुलदीप यादवने 4 बळी घेतले. याशिवाय रवींद्र जडेजाला 1 बळी मिळाला आहे.

पहिल्या डावात ध्रुव जुरेलने ९५ धावांची खेळीकरत टीम इंडियाला अडचणीतून काढले .

भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लंडला भारताविरुद्ध 46 धावांची आघाडी मिळाली. भारतीय संघाकडून यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने पहिल्या डावात ९५ धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जैस्वालने 73 धावा केल्या. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक ५ बळी घेतले. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर संपला. जो रूटने नाबाद 122 धावा केल्या होत्या. भारताकडून रवींद्र जडेजाने पहिल्या डावात सर्वाधिक 4 बळी घेतले.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:-  जाणून घ्या, कोण आहे चेन्नई सुपर किंग चा बाप 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *