Viral Video: जसप्रीत बूमराहने टाकला एवढा जबरदस्त योर्कर की,ऑली पोपला काही कळायच्या आतच झाला बोल्ड हवेत उडाले स्टंप; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0

जसप्रीत बूमराह : विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्यानंतर इंग्लंडनेही पहिल्या डावात दमदार सुरुवात केली, मात्र टीम इंडियाचा उपकर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने झटपट दोन विकेट घेत ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्याने जो रूटला 5 धावांवर आणि ऑली पोपला 24 धावांवर बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावले.

जसप्रीत बुमराहने ओली पोपला केले बोल्ड.

बुमराहने पहिल्या डावात पॉपला  जबरदस्त पद्धतीने बोल्ड केले. जसप्रीत बुमराहच्या दमदार यॉर्करसमोर स्वीप आणि स्विच हिट मास्टर पोप असहाय्य दिसत होता. धडाकेबाज वेगवान गोलंदाजाचा हा यॉर्कर इतका धोकादायक होता की, स्टंप हवेत उडाले.

IND vs ENG Live: सरफराज खानला संधी नाही, रजत पाटीदारचे कसोटीमध्ये पदार्पण, दुसऱ्या कसोटीसाठी असी आहे भारताची प्लेईंग 11..

पोपने आपल्या या छोट्याश्या खेळीमध्ये  55 चेंडूत 23 धावा केल्या, ज्यात त्याने 2 चौकार मारले. पाहुण्यांना चौथा धक्का ओलीच्या रूपाने बसला, जेव्हा त्यांच्या संघाची धावसंख्या १३६ धावांवर होती. याआधी भारतीय वेगवान गोलंदाजाने अनुभवी फलंदाज जो रूट (5) यालाही आपला बळी बनवले. एकंदरीत बुमराहने आतापर्यंत 2 बळी घेतले आहेत.

याशिवाय सलामीवीर जॅक क्रॉलीने महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. त्याने 78 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 76 धावांची शानदार खेळी केली. फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने त्याला आपला शिकार बनवले. त्याचवेळी जॅकचा साथीदार सलामीवीर बॅन डकेट (21)ही फार काही करू शकला नाही. त्याला टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने बाद केले.

दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडने 4 गडी गमावून 155 धावा केल्या होत्या. जॉनी बेअरस्टो (24) आणि कर्णधार बेन स्टोक्स (5) क्रीजवर उभे होते.

तत्पूर्वी, स्फोटक सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या शानदार द्विशतकाच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात 396 धावा केल्या. त्याने 290 चेंडूत 209 धावांची खेळी खेळली, ज्यात 19 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.

Viral Video: जसप्रीत बूमराहने टाकला एवढा जबरदस्त योर्कर की,ऑली पोपला काही कळायच्या आतच झाला बोल्ड हवेत उडाले स्टंप; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

यशस्वीशिवाय शुभमन गिल (34), रजत पाटीदार (32), अक्षर पटेल (27), श्रेयस अय्यर (27), रविचंद्रन अश्विन (20), श्रीकर भरत (17), कर्णधार रोहित शर्मा (14), कुलदीप यादव (14). 8*), आणि जसप्रीत बुमराह (6) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले, परंतु मुकेश कुमार खाते न उघडता बाद झाला.

IND vs ENG: हैदराबाद कसोटीत ओली पॉपने शानदार खेळी केली होती.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात दुसऱ्या डावात फ्लॉप ठरलेल्या ऑली पॉपने शानदार शतक झळकावले. भारत 190 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर, पॉपने 278 चेंडूत 196 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 21 चौकार मारले. त्याच्या खेळीमुळे पाहुण्यांनी टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

त्याच्याशिवाय नवोदित फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीने सामन्यात 9 विकेट घेत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले, परंतु दुसऱ्या कसोटीत हे दोन्ही सामनाविजेते खेळाडू आतापर्यंत काही विशेष करू शकले नाहीत.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडच्या 155 धावा बोर्डावर लागल्या होत्या.

पहा व्हायरल व्हिडीओ.

आता विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ओली पॉप कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave A Reply

Your email address will not be published.