जसप्रीत बुमराहने मोडला आशिष नेहराचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात 2 वेळा केली अशी कामगिरी..!

0
1
जसप्रीत बुमराहने मोडला आशिष नेहराचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात 2 वेळा केली अशी कामगिरी..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

जसप्रीत बुमराह ने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध झालेल्या सामन्यात धारदार गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पाच विकेट घेतले. पाच विकेट घेण्यासोबत आयपीएल मध्ये जसप्रीत बुमराहने इतिहास घडवला आहे. पाच गडी बाद करत बुमराहने आशिष नेहराचा नऊ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

आयपीएल 2024 मधील 25व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्स बरोबर झाला. बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात आठ बाद 196 धावा केल्या. प्रतिउत्तरात मुंबईने तीन गडी गमावून 15.3 षटकात हे आव्हान पार केले. जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा पाच विकेट घेण्याचा कारनामा केला.

जसप्रीत बुमराहने मोडला आशिष नेहराचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात 2 वेळा केली अशी कामगिरी..!

बुमराहने चार षटकात 21 धावा देत पाच गडी बाद केले आणि आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम करत तिसरा वेगवान भारतीय वेगवान गोलंदाज बनला. एकंदरीतच तो जगातला चौथा खेळाडू ठरला. या यादीत जेम्स फॉकनर हा पहिल्या स्थानावर आहे तर जयदेव उनाडकट हा दुसऱ्या आणि भुवनेश्वर कुमार तिसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएल दोनदा पाच विकेट घेणारे गोलंदाज

  1. जेम्स फॉकनर

  2. जयदेव उनादकट

  3. भुवनेश्‍वर कुमार

  4. जसप्रीत बुमराह

बुमराह आरसीबी विरुद्ध एका डावात पाच विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने 2015 मध्ये सीएसकेचा खेळाडू आशिष नेहरा दहा धावा देऊन चार विकेट घेण्याचा विक्रम मोडीत काढला. आरसीबी विरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत बुमराहने रवींद्र जडेजा, संदीप शर्मा, सुनील नरेन यांना पाठीमागे टाकले. बुमराहच्या नावावर आरसीबी विरुद्ध खेळताना सर्वाधिक 29 विकेट घेतल्याची नोंद झाली आहे.

IPL 2024: भारत छोड़ कनाडा में क्यों बसना चाहते थे Jasprit Bumrah? पत्नी के  सवाल पर किया चौंकाने वाला खुलासा - IPL 2024 MI vs RCB Jasprit Bumrah Wanted  To Emigrate To

आरसीबी विरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

  • जसप्रीत बुमराह – 29

  • रविंद्र जडेजा, संदीप शर्मा- 26

  • सुनील नारायण- 24

  • आशीष नेहरा, हरभजन सिंह- 23

बुमराहने पहिल्या पॉवर प्ले मध्ये आरसीबी विरुद्ध सलामीचा फलंदाज विराट कोहली याला बाद केले. तर दुसऱ्या स्पेलमध्ये कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि त्यानंतर महिपाल लोमरोर यांना जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकून फसवले. त्यानंतर 19 व्या षटकामध्ये सौरव चौहान आणि विजयकुमार विषय यांना सलग दोन चेंडूवर बात करत पाच विकेट घेण्याचा कारनामा केला.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here