- Advertisement -

“अंबानी जी इसको मॅच मत देखने दो….” गुजरातविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आला स्टेडियममध्ये, पाहताच चाहत्यांनी केले तुफान ट्रोल…

0 0

“अंबानी जी इसको मॅच मत देखने दो….” गुजरातविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आला स्टेडियममध्ये, पाहताच चाहत्यांनी केले तुफान ट्रोल…


भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे तो क्रिकेट खेळू शकत नाही. या दुखापतीमुळे जस्सी (Jasprit Bumrah) इंडियन प्रीमियर लीगच्या  (ipl2023)16 व्या आवृत्तीचा भाग होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत बुमराहचे(Jasprit Bumrah) चाहते त्याला खूप मिस करत आहेत.

दरम्यान, या अनुभवी गोलंदाजाने त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. 25 एप्रिल रोजी झालेल्या मुंबई इंडियन्स(MI) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) सामन्यात तो सहभागी झाला होता. यानंतर चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.

 जसप्रीत बूमराहने अचानक मैदानात येत चाहत्यांना दिले सर्पराईज..

जसप्रीत बुमराह

मंगळवारी म्हणजेच 25 एप्रिल रोजी IPL 2023 चा 35 वा सामना गुजरात टायटन्स (GUJRAT TITANS) आणि मुंबई इंडियन्स  ( MUMBAI INDIANS) यांच्यात खेळला गेला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (ROHIT SHARMA) नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्या  (HARDIK PANDYA)आणि संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

त्याचवेळी हा सामना सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे एक ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. खरं तर, एमआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे, जो संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) आहे.

फोटो शेअर करताना मुंबई इंडियन्सने (MI) चाहत्यांना माहिती दिली आहे की, बुमराह या सामन्यात आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचला. ट्विट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “बूम-बूम बुमराह.” नुकत्याच झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे तो आयपीएल २०२३ चा भाग होऊ शकला नाही. त्याचवेळी त्याला स्टेडियममध्ये पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

जसप्रीत बूमराहला मैदानावर पाहताच सोशल मिडियावर झाला ट्रोल, पहा ट्वीट…


हेही वाचा:

अजिंक्य रहाणेला संघात घेण्यासाठी स्वतः धोनीने दिला होता खास सल्ला; चेन्नई सुपर किंग्सच्या मालकाने केला मोठा खुलासा..!

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.