IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट 'जसप्रीत बुमराह' आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर...

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL 2024:  भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जगातला वर्ल्ड क्लासचा बॉलर आहे. खतरनाक यॉर्कर चेंडूने भल्याभल्या दिग्गज गोलंदाजाची बोलती बंद करण्यात तो माहीर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबत आयपीएलमध्ये ही त्याची आकडेवारी दमदार आहे.

पाच वेळच्या आयपीएल विजेता मुंबई इंडियन संघातला तो महत्त्वाचा खेळाडू आहे. मागील वर्षी तो दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेला मुकला होता. मात्र तो सध्या आता फिट आहे आणि आयपीएल 2024 मध्ये खेळण्यासाठी तो तयार आहे.

IPL 2024 में खास मिशन के साथ खेलेंगे Jasprit Bumrah, 3 बड़े रिकॉर्ड्स पर होंगी नजरें; दुनिया के दिग्‍गज छूटेंगे पीछे - Ipl 2024 jasprit bumrah eye to break 3 big record

आयपीएल 2024 साठी जसप्रीत बुमराह झाला पूर्णपणे तैय्यार..

यंदा मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. जसप्रीत बुमराह हा सध्या जबरदस्त फॉर्मत आहे. पांड्याच्या नेतृत्वाखालील तो कसा गोलंदाजी करतो हे पाहण्यासारखे आहे. आयपीएल 2024 मध्ये तो काही विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. या तीन विक्रमावर एक नजर टाकूया. 

आयपीएल 2024 मध्ये जसप्रीत बुमराह मोडू शकतो हे 3 मोठे विक्रम.

आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना एकाच हंगामामध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज लसीथ मलिंगा याच्या नावावर आहे. मलिंगाने 2011 मध्ये 28 विकेट घेतले होते तर, जसप्रीत याने आयपीएल 2020 मध्ये 27 विकेट घेतले होते. ज्यात दोन वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम त्याने केला होता. याच वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कंगीसो रबाडा याने 30 विकेट घेऊन पर्पल कॅप जिंकली होती. एकाच सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमावर त्याची नजर आहे.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट 'जसप्रीत बुमराह' आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर...

मुंबई इंडियन्स कडून खेळताना सर्वाधिक षटके टाकण्याचा विक्रम फिरकीपटू हरभजन सिंगच्या नावावर आहे. हरभजन सिंगने मुंबईकडून खेळताना 136 सामन्यात 486.3 षटके फेकली आहेत. तर लसीथ मलिंगा हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 471.1 षटके फेकली आहेत. जसप्रीत बुमराह हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 457.4 षटके टाकली आहेत.

मुंबई इंडियन्स संघातील सहा गोलंदाजांनी आयपीएल मध्ये एकाच डावात पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. त्यामध्ये जसप्रीत बुमराह याचा देखील समावेश आहे. या हंगामात बुमराहने आणखीन एकदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला तर तो मुंबई इंडियन्स संघाकडून सर्वाधिक वेळा पाच गडी बाद करण्याचा पराक्रम त्याच्या नावावर होईल.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *