jasprit Bumrah Statement on Retirement:  विराट,रोहित नंतर जसप्रीत बूमराहनेही केले निवृत्तीवर जाहीर वक्तव्य, पहा काय म्हणाला नक्की बूमराह..

0

jasprit Bumrah Statement on Retirement:  विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम टीम इंडियाच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर वंदे मातरम गाऊन विजयी परेडची सांगता केली.

jasprit Bumrah Statement on Retirement:  विराट,रोहित नंतर जसप्रीत बूमराहनेही केले निवृत्तीवर जाहीर वक्तव्य, पहा काय म्हणाला नक्की बूमराह..

यानंतर खेळाडूंना मंचावर बोलावून सन्मानित करण्यात आले. यावेळी T20 विश्वचषक 2024 मध्ये टूर्नामेंटचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरलेल्या जसप्रीत बुमराहला त्याच्या निवृत्तीबद्दल (jasprit Bumrah Statement on Retirement) विचारण्यात आले, ज्यावर बुमराहने उत्तर दिले की टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घेणार आहे.

निवृत्ती बाबत नक्की काय म्हणाला जसप्रीत बूमराह (jasprit Bumrah Statement on Retirement)

T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या तीन दिग्गज खेळाडूंनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ज्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. त्यानंतर आता बुमराहने निवृत्तीबद्दल उघडपणे बोलले आहे. बुमराह म्हणाला की,

‘सध्या T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही, ही फक्त त्याची सुरुवात आहे. त्यांना अजून पुढे जायचे आहे.

जसप्रीत बुमराह म्हणतो की, मी सहसा कधी रडत नाही पण हा विजय अविश्वसनीय होता. माझ्या मुलाला पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या भावना उमटल्या त्या खूपच आश्चर्यकारक होत्या. यानंतर मला माझे अश्रू आवरता आले नाहीत. मी दोन-तीन वेळा रडलो.

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जसप्रीत बूमराहची शानदार कामिगरी.

jasprit Bumrah Statement on Retirement

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी सादर केली. टीम इंडियाला जेव्हा जेव्हा विकेटची गरज भासली तेव्हा बुमराहने टीमला विकेट मिळवून दिली. या स्पर्धेत बुमराहने 4.17 च्या इकॉनॉमीसह 15 विकेट घेतल्या. भारताला चॅम्पियन बनवण्यात जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बुमराहला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

Leave A Reply

Your email address will not be published.