बूम बूम बुमराह…! जसप्रीत बूमराहने रचला विश्वविक्रम, आजपर्यंत कोणताच भारतीय गोलंदाज विश्वचषक स्पर्धेत करू शकला नव्हता अशी कामगिरी..!

IND vs NZ Most Dot Ball: विश्वचषक 2023 मध्ये या गोलंदाजांची हवा, फलंदाजांना सळो की पळो करून सोडत टाकलेत सर्वाधिक डॉट चेंडू....

  जसप्रीत बुमराह रेकॉर्ड: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विश्वचषक 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या 7व्या सामन्यापर्यंत त्याच्या नावावर 14 विकेट्स होत्या. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि त्याला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 357 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाला पहिल्या चेंडूवरच यश मिळाले. यासह बुमराहने इतिहास रचला आहे. विश्वचषकात यापूर्वी कधीही घडले नव्हते असे त्याने केले.

जसप्रीत बुमराह

IND VS SL: जसप्रीत बूमराहने रचला इतिहास,  अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय गोलंदाज.

 जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) एकदिवसीय विश्वचषकात डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या ४८ वर्षांच्या इतिहासात त्याच्या आधी कोणीही अशी कामगिरी करू शकले नव्हते. हा स्वतःच एक मोठा पराक्रम आहे. बुमराहची चालू टूर्नामेंटमधली ही 15वी विकेट होती. गेल्या वर्षभरापासून तो जखमी होता. 2022 च्या टी-20 विश्वचषकातही तो खेळला नव्हता. पण जेव्हापासून त्याने जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन केले तेव्हापासून तो अप्रतिम फॉर्ममध्ये आहे.

 

या सामन्यात भारतीय संघाने 357 धावांची मोठी मजल मारली होती. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने पहिल्या पाच विकेट केवळ 14 धावांत गमावल्या. पहिल्या पाच षटकांत संघाची धावसंख्या चार विकेट्स ५० धावांवर होती. मोहम्मद सिराजने पहिल्या दोन षटकांत तीन बळी घेतले होते. तर बुमराहने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत विकेटचे खाते उघडले. याआधी आशिया कप २०२३ च्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. त्या सामन्यात श्रीलंकेचा संघ केवळ ५० धावांवरच मर्यादित राहिला होता.

जसप्रीत बूमराह

तत्पूर्वी, फलंदाजीमध्ये शुभमन गिलने ९२ धावांची, विराट कोहलीने ८८ धावांची आणि श्रेयस अय्यरने ८२ धावांची शानदार खेळी भारताकडून खेळली होती. भारतीय संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात आपली सर्वोच्च धावसंख्या केली. यासह टीम इंडियाने स्पर्धेतील सलग 7 व्या विजयाकडे वाटचाल केली आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *