ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
नवज्योतसिंग सिद्धू: लोकसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे कॉमेंट्री पॅनल मध्ये दाखल झाले आहेत. मार्च 22 पासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 मध्ये सिद्धू समालोचक म्हणून काम करणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या यांचे पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याची माहिती स्टार स्पोर्ट्स वाहिनीने त्यांच्या ट्विटरवर ही दिली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू करणार आयपीएल 2024 मध्ये समालोचन.!
नवज्योतसिंग सिद्धू हे क्रिकेटमध्ये समालोचन करणार असल्याने ते लोकसभा निवडणुकीत लढणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षापासून त्यांना राजकारणात फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा क्रिकेटची वाट धरली. आयपीएल 2024 मधील पहिला सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यात नवज्योत सिंग सिद्धू यांची शेरोशायरी ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होणार आहे.
क्रिकेट कॉमेंट्री पासून दूर राहिलेल्या सिद्धू हे वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले होते. 2019 मध्ये द कपिल शर्मा शो मधून ते बाहेर पडले. अत्यंत शांत स्वभाव असलेल्या 60 वर्षीय सिद्धू यांनी 2001 मध्ये कॉमेंट्री मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ते एक वेगळ्या अवतारात पाहायला मिळाले. त्यांच्या शेरोशायरी अनेकांना दिवाने केले. क्रिकेटमधील बारकावे ते आपल्या वेगळ्या स्टाईलने सांगायचे. त्यामुळे त्यांची फॅन फॉलोईंग जबरदस्त राहिली.
नवज्योत सिंग सिद्धू हे इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी भाषेत समालोचन करतात. या तिन्ही भाषेवर त्यांच्या जबरदस्त प्रभुत्व आहे. मात्र स्टार स्पोर्ट्सने ते कोणत्या भाषेमध्ये समालोचन करणार आहेत, हे अद्याप निश्चित केले नाही. त्यांचा हा आवाज केवळ स्टार स्पोर्ट्स वर ऐकायला मिळणार आहे. डिजिटल राईटस जिओ सिनेमा कड आहे. तेथील कॉमेंट्री पॅनल वेगळे आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी 15 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवला. 1983 ते 1998 पर्यंत त्यांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली. त्यांनी भारतातर्फे 51 कसोटी आणि 136 वनडे सामने खेळले आहेत. ज्यात अनुक्रमे कसोटी 3203 आणि वनडे 4413 धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 15 शतक आणि 48 अर्धशतके ठोकली आहेत.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.