नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका पार पडली. ही मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रांचीच्या मैदानावर पार पडणार आहे. या मालिकेसाठी यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माला देखील संधी देण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जितेश शर्माने जोरदार कामगिरी केली आहे. आता तो भारतीय संघासाठी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने एमएस धोनीचा एक रोमांचक किस्सा सांगितला आहे.
जितेश शर्माने क्रिकइन्फोला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील खास गोष्टी शेअर केल्या आहेत. त्याने एमएस धोनीचा उल्लेख करत म्हटले की, “मला असे वाटते की,धोनी सर्वांसाठी आदर्श आहे. त्यानंतर दुसरे असतील. मी त्याच्यापासून खूप प्रेरित आहे. पदार्पणाच्या सामन्यादरम्यान मी त्याच्याशी १०-१५ मिनिटे बोललो होतो. मी त्याला विचारले होते की मी स्वतःला पुढे कसे ढकलू शकतो. क्रिकेट सगळीकडे सारखेच असते, असे अतिशय साधे उत्तर त्यांनी दिले. फक्त तीव्रता वेगळी आहे. तू तीव्रता बदलत रहा.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मुंबई इंडियन्स साठी २ वर्ष खेळलो. ते २ वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात खास होते. त्यावेळी मी खूप लहान होतो. मात्र त्यांनी मला असे कधीच वाटू दिले नाही. मी ड्रेसिंग रूममध्ये खूप कमी बोलायचो. मात्र मी खूप काही शिकलो आहे. मला सचिन सरांचा आवाज ऐकून खूप आनंद व्हायचा. तसेच रोहित सरांना पाहून देखील खूप आनंद व्हायचा. मी खूप लहान होतो. मला माहित होतं लवकर संधी मिळणार नाही. मात्र मी खूप काही शिकलो.”
हे ही वाचा..
ठरलं तर ‘या’ दिवशी होणार जसप्रीत बुमराहचे पुनरागमन! स्वतः रोहित शर्माने केला खुलासा..