IPL 2024: जोफ्रा आर्चर आयपीएलच्या पहिल्या सामन्यात खेळणार? क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता..

IPL 2024: जोफ्रा आर्चर आयपीएलच्या पहिल्या सामन्यात खेळणार? क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL 2024,जोफ्रा आर्चर : इंग्लंडचा खतरनाक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये आरसीबीच्या संघामध्ये खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बंगळूर येथे ससेक्स संघाचा सामना सुरू आहे. या सामन्यांमध्ये तो जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. गोलंदाजी करतानाचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या या वायरल व्हिडिओ वरून प्रसार माध्यमांमध्ये तो आयपीएल मध्ये खेळेल अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

चेन्नई सुपर किंग्स  आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (CSK vs RCB)  सामन्यात जोफ्रा आर्चर खेळणार?

आयपीएल मधील पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स  आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (CSK vs RCB)  यांच्यात होणार आहे. जोफ्रा आर्चर ची गोलंदाजी पाहून क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

बंगळूर जवळील अलूर येथील केएससीए मैदानावर ससेक्स आणि कर्नाटक यांच्या दोन दिवसीय सराव सामना सुरू आहे. या सामन्यात जोफ्रा आर्चर खेळताना दिसून आला. ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेट खेळणाऱ्या आर्चरने या सामन्यात कर्नाटकच्या संघाकडून पर्यायी खेळाडू म्हणून खेळताना दिसून आला.

IPL 2024: जोफ्रा आर्चर आयपीएलच्या पहिल्या सामन्यात खेळणार? क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता

आर्चरने सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजी केली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी त्याने दोन गडी बाद केले. आर्चरने गेल्या वर्षभरापासून एकही सामना खेळला नाही. कर्नाटक संघाकडून खेळताना त्याने ससेक्स संघाच्या दोन सहकाऱ्यांना बाद केले. त्यातील एक विकेट तर अविस्मरणीय ठरली.

आर्चरने त्याचा शेवटचा आयपीएलचा सामना गतवर्षी खेळला होता. 2022 मध्ये त्याला दुखापतीमुळे आयपीएलच्या हंगामाला मुकावे लागले. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी आयपीएलमध्ये पुनरागमन केले. पाच टी 20 सामन्यांमध्ये त्याला दोन विकेट घेण्यात यश मिळाले.

पाच वेळची चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सला त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मुंबईला सहाव्यांदा चषक जिंकून देण्यात तो यशस्वी होईल, असे वाटत होते. मात्र त्याला दुखापतीने घेरले. त्याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीवर दिसून आला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या लिलावापूर्वी त्याला रिलीज करून टाकले.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.