जोस बटलर ने शंभराव्या सामन्यात शतक ठोकून केली ‘या भारतीय खेळाडूंच्या विक्रमाशी बरोबरी,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

0
5
जोस बटलर ने शंभराव्या सामन्यात शतक ठोकून केली 'या भारतीय खेळाडूंच्या विक्रमाशी बरोबरी,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जोस बटलर: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात विजयी चौकार लगावला. आयपीएलच्या 17व्या हंगामामध्ये संजू सॅमसनच्या टीमने आतापर्यंतचा दमदार प्रवास केला आहे. कोहलीने जयपूर येथे झालेल्या सामन्यांमध्ये 72 चेंडूत 12 चौकार आणि चार उत्तुंग षटकाराच्या मदतीने नाबाद 113 धावांची शतकी खेळी केली. 19 व्या सामन्यात आरसीबीने 20 षटकात 3 बाद 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने पाच चेंडू आणि सहा गडी राखून हा सामना आपल्या नावे केला. जोस बटलर ने शानदार शतक ठोकून आरसीबीच्या तोंडून विजयाचा गास हिरावून घेतला.

जोस बटलरने पूर्ण केले आयपीएलच्या इतिहासातील सहावे वैयक्तिक शतक.

बटलरने कॅमरन ग्रीनच्या षटकामध्ये षटकार ठोकून त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएल मधील सहावे शतक होते. बटलरने आयपीएलच्या शंभराव्या सामन्यामध्ये शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. बटलर पूर्वी केएल राहुल याने हा कारनामा केला होता. राहुलने त्याच्या शंभराव्या आयपीएल सामन्यात शतकी खेळी केली होती. राजस्थानने बंगळुरूला हरवून विजयाचा चौकार लगावला. आरसीबीचा आयपीएल 2024 मधला हा सलग चौथा पराभव आहे.

जोस बटलरने शतक ठोकून आयपीएल मध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा माजी खेळाडू क्रीस गेल याच्या विक्रमाशी बरोबर केली आहे. बटलरचे हे सहावे शतक होते. क्रिस गेल ने देखील आयपीएल मध्ये सहा शतक लगावले आहेत. केएल राहुल ने आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत. याशिवाय डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांनी देखील प्रत्येकी चार शतके ठोकली आहेत.

जोस बटलर ने शंभराव्या सामन्यात शतक ठोकून केली 'या भारतीय खेळाडूंच्या विक्रमाशी बरोबरी,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

बटलरने शतक ठोकून अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. तसेच राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थानकडून खेळताना सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्या नावावर आहे. तो सध्या आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतोय. बटलरने आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळताना 2831 धावा केल्या आहेत तर राहणे ने 1810 धावा केल्या आहेत. कर्णधार संजू सॅमसन हा पहिल्या स्थानावर आहे. तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 3389 धावा केल्या आहेत.

केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना 2022 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 60 चेंडूत नावात 103 धावा केल्या होत्या. त्याने हे कामगिरी त्याच्या शंभराव्या सामन्यात केली होती. अशी कामगिरी करणारा तो आयपीएल मधला पहिला फलंदाज ठरला आहे. आयपीएल 2024 मधील कामगिरीचा विचार केला तर आत्तापर्यंत काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केले होती. त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात तो फेल गेला. दुसऱ्या सामन्यात 15 तर तिसऱ्या सामन्यात तो केवळ 20 धावा करू शकला.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…