गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ‘जॉस बटलर’ने केला या हंगामात देखील महाविक्रम, आयपीएलमध्ये 3000 धावा तर पूर्ण केल्याच शिवाय हे 2 मोठे विक्रमदेखील मोडले..!
राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलर (Joss Buttler) एकामागून एक नवनवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. बुधवारी त्याने पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स (Csk)विरुद्धच्या सामन्यात आपल्या तुफानी फलंदाजीनेधुमाकूळ घातला.. CSK विरुद्धच्या सामन्यात बटलरने 36 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकार मारत 52 धावा केल्या. यासह त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा बटलर तिसरा खेळाडू ठरला. बटलरने आपल्या 85व्या डावात हा टप्पा गाठला.
बंगलोर विरुद्ध लखनऊ जायन्ट्स चा होणार सामना, तर आज या खेळाडूंना भेटणार मोका तर हे खेळाडू बसणार बाहेर

या स्पर्धेत सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहे. बटलरने अवघ्या 75 डावात 3000 धावा पूर्ण केल्या होत्या. दुसरीकडे टीम इंडियाचा सलामीवीर आणि लखनौ सुपर जाइटसचा (LSG) कर्णधार केएल राहुल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
गुजरात टायटन्स चा यश दयाल ला ५ सिक्स मारल्याने त्याच्या आईने सोडले अन्न, वडिलांनी केला मोठा खुलासा
हा टप्पा गाठण्यासाठी राहुलला 80 डाव फलंदाजी करावी लागली. बटलरने बुधवारी आयपीएलमधील 18 वे अर्धशतक झळकावले. 17व्या षटकात रवींद्र जडेजाने त्याला बोल्ड केले. सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत बटलरने डेव्हिड वॉर्नर आणि फाफ डू प्लेसिसला मागे टाकले आहे.
Jos Buttler completed 3000 runs in IPL with 40+ AVG & 150+ SR.
One of the finest ever. pic.twitter.com/H7C6LbhJ6A
— Johns. (@CricCrazyJohns) April 12, 2023
बटलर आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्याने 863 धावा केल्या आणि चार शतके ठोकली. राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीराने या मोसमात चार सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली आहेत आणि यावेळीही तो ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार आहे.
IPL मध्ये सर्वात वेगवान 3,000 धावा करणारे फलंदाज(Fastest 3000 runs By players in ipl)
ख्रिस गेल – 75 डाव
केएल राहुल – 80 डाव
जोस बटलर – 85 डाव
डेव्हिड वॉर्नर – ९४ डाव
फाफ डू प्लेसिस – ९४ डाव
हेही वाचा: