जॉस बटलर: आयपीएल 2024 मध्ये एकापेक्षा एक रोमांचकारी सामने पाहायला मिळत. आहेत. 31 व्या सामन्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर एक रोमांचकारी सामना पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स आणि केकेआर यांच्यात यांच्यात झालेल्या सामन्यात संजू सॅमसनच्या टीमने दोन विकेटने सामना जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे राजस्थान चा सलामीवर ‘जॉस बटलर’ ज्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत एक शानदार ठोकून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बटलरने 60 चेंडूत नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. या हंगामातले त्याचे हे दुसरे शतक आहे. बटलरने हे शतक ठोकून त्याच्या नावे अनेक विक्रमांची नोंद केली आहे.
KKR vs RR: जॉस बटलरमे ठोकले आयपीएलमधील 7वे शतक..
जॉस बटलर आयपीएलच्या 17 व्या हंगामात दोन शतक ठोकणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी त्याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकले होते आयपीएलच्या इतिहासात त्याचे हे सातवे शतक ठरले. या शतकी खेळीच्या जोरावर त्याने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतक ठोकणारा क्रिस गेल याच्याही पुढे गेला आहे. त्याचे हे आयपीएलच्या इतिहासातील 7 वे शतक ठरले. या कोहलीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे ज्याने आठ शतके ठोकली होती.
आयपीएल मध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे खेळाडू (Most Centuries in ipl History)
-
8-विराट कोहली
-
7 – जोस बटलर
-
6 – क्रिस गेल
-
4- केएल राहुल
-
4 – डेविड वार्नर
-
4 – शेन वॉटसन
पहा व्हायरल व्हिडीओ,
Josh Buttler greatest chase in ipl history take a bow inning by Joss! 🔥
Now Rajasthan Royals 12 point Top rank 🔥👏#KKRvRR pic.twitter.com/G9hVFk9Q60
— PretMeena (@PretMeena) April 16, 2024
सामन्या विषयी बोलायचं झाले तर, ईडन गार्डनच्या सामन्यात जोस बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने हा सामना दोन विकेट राखून जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थान ने घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकात सहा बाद 223 धावा केल्या. यात सुनील नरेन ने 56 चेंडूत 109 धावांची शतकी खेळी केली. प्रतिउत्तरात राजस्थानने 20 षटकात आठ बाद 224 धावा सहज पार केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सक्सेसफुल धावसंख्या ठरली. यापूर्वी राजस्थान रॉयल्सने 2020 मध्ये पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 224 धावांचे आव्हान पार केले होते.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.