“कर्णधार म्हणून राहुल भारतीय संघासाठी पनोती आहे” राहुल कर्णधार असल्यस सहसा भारत जिंकत नाही सामना, पहा राहुलचे अनोखे विक्रम..
भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ वनडे मालिकेतील दुसरा सामना काल ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला गेला. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी 50 षटकांत 7 गडी गमावून 271 धावा केल्याहिटमॅनला दुखापत झाल्यानंतर केएल राहुलने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी 272 धावांची गरज आहे.
View this post on Instagram
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या कामगिरीने चाहते प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहते आपला राग काढत आहे. 19व्या षटकापर्यंत बांगलादेशचा संघ 6 विकेट गमावून 69 धावा करू शकला, मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांना विकेट्ससाठी झगडावे लागले.
View this post on Instagram
महमुदुल्लाह आणि मेहदी हसन मिराज यांच्यात 7व्या विकेटसाठी 165 चेंडूत 148 धावांची विक्रमी भागीदारी झाली. 47 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमरानने ही भागीदारी मोडली. 96 चेंडूत 77 धावा करणाऱ्या महमुदुल्लाला केएल राहुलने शानदार झेलबाद केले.
कर्णधार म्हणून के.एल.राहुलची कामगिरी आहे अशी.
कर्णधार म्हणून केएल राहुलचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. त्याने आतापर्यंत 6 सामन्यांमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळली आहे. भारताने जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यावर 3 वनडे मालिका केएल राहुलकडे होती.

टीम इंडियाच्या मालिकेतील एकही सामना जिंकला नाही. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली. येथेही दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली गेली, जी भारताने 3-0 ने जिंकली.
केएल राहुल कर्णधार म्हणून खेळलेले सामने.
१९ जानेवारी २०२२ विरुद्ध दक्षिण आफ्रिका: भारत ३१ धावांनी हरला
21 जानेवारी 2022 विरुद्ध दक्षिण आफ्रिका: भारत 7 गडी राखून हरला
23 जानेवारी 2022 विरुद्ध दक्षिण आफ्रिका: भारत 4 धावांनी हरला
हेही वाचा: