Viral Video: बेंचवर बसून सामना पाहात असणाऱ्या ‘केन विल्यम्सन’ने जिंकले चाहत्यांचे हृदय: संघ सहकाऱ्यांसाठी पाणी घेऊन आला मैदानात..

 IND vs NZ: न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन (kane-williamson) याने आपल्या फलंदाजीने आणि नेतृत्वाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. दुखापतीमुळे सध्या केन विल्यम्सन बेंचवर बसून आहे. त्याच्या अनुपस्थितीत टॉम लाथम संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. तो संघाबाहेर बसला तरी, आपल्या संघ सहकाऱ्यांना वेळोवेळी मदत करताना दिसून येत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात सुद्धा केन असच आपल्या खेळाडूंच्या मदतील पाणी घेऊन येताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video: बेंचवर बसून सामना पाहात असणाऱ्या 'केन विल्यम्सन'ने जिंकले चाहत्यांचे हृदय: संघ सहकाऱ्यांसाठी पाणी घेऊन आला मैदानात..

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला. त्यावेळी झीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन (kane-williamson संघ सहकार्यांसाठी ड्रिंक्स घेऊन मैदानात उतरला. त्याचे हे कृत्य आणि खेळाडू विषयीच्या भावना सर्वांनाच भावल्या. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम न्यूझीलंडला फलंदाजीसाठी प्राचारण केले. मात्र न्युझीलँड संघाच्या सुरुवातीचे दोन गडी लवकर बाद झाले. रचीन रवींद्र आणि डॅरल मिचेल यांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.

ड्रिंक्स ब्रेक सुरू असताना केन विल्यम्सन या दोन्ही खेळाडूंसाठी पाणी घेऊन मैदानात आला. यावेळी त्याने दोन्ही खेळाडूंशी संवाद साधला. रचीन रवींद्र आणि डॅरल मिचेल हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेत भाग खेळत आहेत. केन विल्यम्सन पहिल्या दोन सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तिसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे तो चौथ्या सामन्यातून बाहेर पडला. आज भारताविरुद्धच्या सामन्यात देखील तो खेळू शकला नाही.

केन विल्यम्सन

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम न्यूझीलंडला फलंदाजीस प्रचारण केले. न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. शून्य धाव संख्येवर डेव्हिड कॉन्वे माघारी परतला. विश्वचषक स्पर्धेत पहिला सामना खेळणाऱ्या शमीने त्याला क्लीन बोल्ड केले. मोहम्मद सिराजने विल यंग याला 17 धावांवर बाद केले.

त्यानंतर रवींद्र रचीन आणि डॅरेल मिचल यांनी न्युझीलँड चा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी शतकीय भागीदारी केली. रवींद्र रचीन याने 87 चेंडूत 75 धावांची खेळी केली. यात सहा चौकार व एका षटकारांचा समावेश होता. डॅरल मिचल याने 129 चेंडूत 130 धावा केल्या या खेळीत त्याने नऊ चौकार आणि पाच षटकार ठोकले. या दोघांच्या खेळीच्या जीवावर न्यूझीलंड संघाने 50 षटकात सर्व बाद 273 धावा केल्या.

.. आणि केन विल्यम्सन चक्क पाणी घेऊन मैदानावर आला, पहा व्हिडीओ.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

मोहम्मद शमी याने 54 धावा देत पाच गडी बाद केले तर सिराज आणि बुमराह यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला तर कुलदीप यादवने दहा षटकात 76 धावा देत दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाला एकही गडी बाद करता आला नाही. मोहम्मद शमीने या सामन्यात भेदक गोलंदाजी करत सर्वांना प्रभावित करून टाकले. पहिल्या चार सामन्यात बेंचवर बसून असलेल्या शमीने सारा राग न्यूझीलंडच्या फलंदाजांवर काढला. रोहित शर्माने शार्दुल ठाकूरच्या जागी आज शमीला संधी दिली होती. त्या संधीचे सोने करत त्याने न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले.

न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 273 धावा काढून बाद झाला आणि टीम इंडियाने हे लक्ष पार करत या सामन्यात विजय मिळवला.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *