- Advertisement -

केन विल्यमसन सोबत आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात घडला मोठा अपघात, मैदानात वेदनेने विव्हळताना दिसला न्यूझीलंडचा कर्णधार, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0 1

केन विल्यमसनसोबत पहिल्याच सामन्यात घडला मोठा अपघात,मैदानात वेदनेने विव्हळताना दिसला न्यूझीलंडचा कर्णधार,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यातील IPL 2023 (IPL 2023) चा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. हा धक्का त्याच्या पहिल्याच सामन्यात जखमी झालेल्या केन विल्यमसनचा आहे. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 या सामन्यात (GT vs CSK) कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून आमनेसामने आहेत.

केन विल्यमसन

केन विल्यमसन झाला जखमी!

ही घटना १२.३ षटकात घडली. जोसुआ लिटल बॉलिंग आणि गायकवाड बॅटिंग करत होता. या तरुण फलंदाजाने पुढच्या पायावरून चेंडू फ्लिक केला आणि चेंडू मिडविकेटवर सीमारेषेबाहेर जात होता, पण तिथे असलेल्या केन विल्यमसनने उडी मारून चेंडू सीमारेषेवर फेकला.केन विल्यमसन खूप प्रयत्न केले पण चेन्नईला 4 धावा मिळाल्या.

मात्र, यादरम्यान तो गंभीर जखमी झाला. उडी घेतल्यानंतर तो गुडघ्यावर पडला आणि पडताच उजव्या गुडघ्याला जबरदस्त मार बसला, चेंडू फेकल्यानंतर त्याचा पाय जमिनीवर जोरात आदळला. यानंतर वैद्यकीय पथकाला मैदानात यावे लागले त्यानंतर ते केन विल्यमसनला  बाहेर गेले. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

केन विल्यमसन त्यानंतर क्षेत्ररक्षणास सुद्धा आला नाही आता तो फलंदाजीस सुद्धा येतो का नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.वरून पाहता तरी केनची अवस्था साधारण वाटत असली तरीही तो पूर्णपणे फिट आहे का नाही या बद्दल आजून कोनतीही माहिती समोर आली नाहीये . मात्र जर केन लवकरात लवकर मैदानात आला नाही तर हा गुजरात साठी मोठा धक्का मानवा लागेल.


हेही वाचा:

9 षटकार, 4 चौकार.. गुजरातमध्ये पुण्याचा ऋतुराज गायकवाडने उठवले वादळ..!आयपीएलच्या पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक ठोकत काढल्या एवढ्या धावा.

पहिल्याच सामन्यात हार्दिक पंड्याने दाखवला घमंडी अवतार.. धोनी सोडून सर्वाशी मिळवले हात मात्र धोनीकडे केले दुर्लक्ष, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IPL 2023 मध्ये CSK या 4 खेळाडूंच्या मदतीने मोठा खेळू शकते, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

Leave A Reply

Your email address will not be published.