- Advertisement -

आयपीएल 2023 स्पर्धा सुरू असताना मोठी बातमी आली समोर, दिग्गज खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार…

0 0

आयपीएल २०२३ स्पर्धा सुरू असताना एक अशुभ बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून खेळताना दुखापत झालेला न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या २०२३ वनडे विश्वचषकातून बाहेर जाऊ शकतो.

केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्यानंतर न्यूझीलंडला परतला होता आणि मंगळवारी स्कॅन केल्यानंतर त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समोर आले आहे. अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गुजरात टायटन्सकडून क्षेत्ररक्षण करताना केन विल्यमसनला दुखापत झाली होती.

न्यूझीलंड क्रिकेटच्या विधानानुसार केन विल्यमसनवर येत्या ३ आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येईल . ही बातमी मिळाल्यानंतर केन विल्यमसनने न्यूझीलंड क्रिकेट आणि आयपीएल फ्रँचायझीचे आभार मानले.

केन विल्यमसन हा न्यूझीलंड संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझीलंड संघाने २०१५ आणि २०१९ वनडे वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.