Accuses of Switching Wankhede Pitch: न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची खेळपट्टी वादात उडी, सामना संपताच बदलण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत केले मोठे वक्तव्य…

केन विल्यमसन: काल (15 Nov) विश्वचषक 2023 च्या  उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. हा सामना जिंकून टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात वापरण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली आणि खेळपट्टी बदलण्याबाबतही चर्चा झाली . आता थेट न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने या खेळपट्टीच्या वादात उडी घेतली आहे.

 IND vs NZ: सेमीफायनल सामना  संपल्यानंतर विल्यमसनने खेळपट्टीबाबत केले मोठे वक्तव्य..

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची खेळपट्टी वादात उडी, सामना संपताच बदलण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत केले मोठे वक्तव्य...

किवी कर्णधाराने कबूल केले की, वापरण्यात आल्यानंतरही ही खेळपट्टी खूप चांगली होती. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना केन विल्यमसन म्हणाला, “जरी ही एक वापरलेली विकेट असली तरीही खेळपट्टी खूप चांगली होती आणि भारतीय खेळाडूंनी फलंदाजी करताना त्याचा पुरेपूर फायदा घेतला. त्याचवेळी संध्याकाळपर्यंत परिस्थिती बदलल्याचे पाहायला मिळाले. “पण तरीही आम्ही खरोखरच चांगला खेळ केला.” उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला असला तरीही संघाने शेवटपर्यंत धीर सोडला नाही आणि विल्यमसनलाही आपल्या संघाचा खूप अभिमान आहे.

 IND vs NZ: वानखेडेवर भारतीय खेळाडूंनी केले जबरदस्त प्रदर्शन..

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 397 धावा केल्या होत्या. भारताकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने 117, श्रेयस अय्यरने 105, शुभमन गिलने 80, रोहित शर्माने 47 आणि केएल राहुलने नाबाद 39 धावा केल्या. गोलंदाजीत मोहम्मद शमीचा कहर पाहायला मिळाला. शमीने एकट्याने 7 किवी फलंदाजांना बाद केले होते.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची खेळपट्टी वादात उडी, सामना संपताच बदलण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत केले मोठे वक्तव्य...

398 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर गडगडला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३४ धावांची खेळी खेळली. याशिवाय कर्णधार केन विल्यमसनने ६९ धावांची खेळी केली. आता वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.


हेही वाचा: