- Advertisement -

DC vs GT: दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी हार्दिक पंड्याने आखली मोठी रणनीती, केन विल्ययमसनच्या जागी या स्फोटक फलंदाजाला केले संघात सामील..पाकिस्तानमध्ये जाऊन काढले होते फोडून..

0 0

दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी हार्दिक पंड्याने आखली मोठी रणनीती, केन विल्ययमसनच्या जागी या स्फोटक फलंदाजाला केले संघात सामील..पाकिस्तानमध्ये जाऊन काढले होते फोडून..


इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 2023 मध्ये आज सातवी लढत आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही तगडे संघ आमनेसामने असतील. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे. दिल्ली संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे.

कार अपघातानंतर जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या जागी यावेळी दिल्ली संघाची धुरा डेविड वॉर्नरच्या खांद्यावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघ एक सामना खेळला आहे आणि त्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. (Latest sports updates)

दिल्लीचा संघ गुजरातला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पाच विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे आपली विजयी मालिका सुरूच ठेवण्याच्या मनसुब्याने टीम हार्दिक मैदानात उतरेल.

केन विल्ययमसन

पण गुजरातच्या हार्दिक पंड्यासमोर प्लेइंग ११ निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. पहिल्याच सामन्यात दुखापतीमुळे न्यूझीलंडचा केन विलियमसन आयपीएलमधून बाहेर झाला आहे. अशात प्लेइंग ११ मध्ये विलियमसनच्या जागी तितकाच ताकदीचा खेळाडू निवडावा लागणार आहे.

विलियमसनची जागा घेऊ शकतो हा खेळाडू

विलियमसन आता पूर्ण आयपीएलमधूनच ‘आउट’ झाला आहे. त्याच्या जागी कोण असा प्रश्न आ वासून उभा आहे. आयपीएल गाजवणारा आणि षटकारांची आतषबाजी करणारा डेविड मिलर आता गुजरात संघात एन्ट्री घेऊ शकतो. मिलर या मोसमातील पहिला सामना खेळला नव्हता. ३ एप्रिलला तो संघात परतला आहे. त्यामुळे आता प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी दिली जाऊ शकते.

गुजरात टायटन्स:

शुभमन गिल, रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, जोश लिटिल, मोहम्मद शमी, यश दयाल किंवा साई सुदर्शन

दिल्ली कॅपिटल्स

पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, रोवमॅन पॉवेल, अमन खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, एनरिख नॉर्खिया, खलील अहमद किंवा मनीष पांडे


हेही वाचा:

IPL 2023 मध्ये CSK या 4 खेळाडूंच्या मदतीने मोठा खेळू शकते, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

Leave A Reply

Your email address will not be published.