कंगारू खेळाडू डेविड वॉर्नरने केला नवा विक्रम; अशी कामगिरी करणारा बनला पहिला विदेशी खेळाडू

Record: डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास... क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला ऑस्ट्रोलीयन खेळाडू..!

रविवारी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने बलाढ्य मानल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा 20 धावांनी  पराभव केला. आयपीएल 2024 मधला हा दिल्ली कॅपिटल्सचा पहिला विजय ठरला. सीएसके विरुद्धच्या या सामन्यात दिल्लीकडून खेळणारा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नर याने धमाकेदार कामगिरी केली. त्याने पृथ्वी शॉ सोबत सलामीला खेळताना तडाखेबाज सुरुवात करून दिली. त्याच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावरच दिल्लीला या सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश मिळाले. या सामन्यामध्ये त्याने अर्धशतक ठोकले आणि एक नवा विक्रम प्रस्थापित केला. 

चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या या सामन्यांमध्ये वॉर्नरने धडाकेबाज सुरुवात केली. त्याने मैदानाच्या चारही दिशेने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने अवघ्या 35 चेंडूत 52 धावा केल्या. त्यात चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. यासह त्यांनी आयपीएलमध्ये 6500 धावा करण्याचा विक्रम पूर्ण केला.

डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या इतिहासामध्ये साडेसहा हजार पेक्षा जास्त धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहलीने 7444 आणि शिखर धवनने 6754 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. आयपीएल मध्ये तो 7000 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.

डेव्हिड वॉर्नरची गणती जगातल्या सर्वोत्तम फलंदाजामध्ये होते. आयपीएल 2009 मध्ये त्याने पदार्पण केले होते. आयपीएल मध्ये आतापर्यंत त्याने सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल मधील 179 सामन्यात 6527 धावा केले आहेत, ज्यात चार शतकांचा समावेश आहे.

आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

विराट कोहली- 7444 रन

शिखर धवन- 6754 रन

डेविड वॉर्नर- 6527 रन

रोहित शर्मा- 6280 रन