रोमहर्षक सामन्यात कांगारूंचा पाच धावांनी विजय; न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव

ऑस्ट्रेलियाने धर्मशाला येथे झालेल्या रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव केला. ट्रेविस हेड (109) आणि डेविड वॉर्नर (81) यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्युझीलँड पुढे विजयासाठी 389 धावांचे विशाल लक्ष ठेवले होते. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 49.2 षटकात 388 धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 389 हे डोंगराएवढया धावाचे आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 9 बाद 383 धावा करू शकला.

पहिले दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली तर न्यूझीलंडचा मागील दोन्ही सामन्यात पराभव झाला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाचे सहा सामन्यात चार विजयासह आठ गुणांसह आहेत. तो संघ चौथ्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडचा संघ तितकेच अंक घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा रन रेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला आहे.

रचीन रवींद्र याने शानदार 116 धावांची शतकी खेळ केली तर डेरेल मिचेल याने 54 धावांचे योगदान दिले. शेवटच्या काही षटकात जिमी निशम याने आक्रमक फलंदाजी करत 39 चेंडू 58 धावांची लयलूट केली. एक चोरटी धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो धाव बाद झाला. यासह न्यूझीलंडच्या सामना जिंकण्याच्या आशा देखील मावळून गेल्या.

आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना हवी तशी गोलंदाजी करता आली नाही. स्टार्कने सर्वाधिक धावा दिल्या. त्याच्या 9 षटकात 89 धावांची लयलूट झाली. तर जोश हेजलवुडने 9 षटकात 70 धावा देतो दोन गडी बाद केले तर कर्णधार पॅट कमिन्स याने 66 धावा देत दोन महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यात त्याला यश आले तर ॲडम जॅम्पा याने 10 षटकात 74 धावा देऊन तीन गडी बाद केले तर मॅक्सवेल ने 10 षटकात 62 धावा देऊन एकमेव गडी बाद करता आला.

वॉर्नरने त्याचे अर्धशतक 28 चेंडूत पूर्ण केले तर 23 ने 25 चेंडूत अर्धशतकीय खेळे केले. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 175 धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलिप्स याने डेव्हिड वॉर्नरला बाद केले. हेड विक्रमी शतक ठोकल्यानंतर फिलिप्सच्या चेंडूवर बाद झाला.

वॉर्नर आणि हेड हे खेळपट्टीवर असताना ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात 500 पेक्षा जास्त धावा काढेल असे सर्वांना वाटत होते. मात्र हे दोघेही बाद होताच न्यूझीलंडने सामन्यात जोरदार कमबॅक केले. फिलिप्स आणि सेंटनर यांनी ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत.अचानक ऑस्ट्रेलियाची धावांची गती कमी झाली. मिचेल मार्श 36, स्टीव्ह स्मिथ 18, मारनस लाबुशेन याने 18 धावा केल्या.

ग्‍लेन मॅक्‍सवेल (41), जोश इंग्लिस (38) आणि पॅट कमिंस (37) ने चौकार षटकारांची आतिषबाजी केली. पण संपूर्ण संघ पन्नास षटके देखील खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या डावात एकूण 20 षटकार आणि 32 चौकार मारले. ऑस्ट्रेलियाने जवळपास 248 धावा चौकार आणि षटकार मारून काढले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. मिचल सॅटनर याला दोन गडी बाद करता आले. मॅट हेनेरी आणि जेम्स नीशम यांनी देखील एक एक गडी बाद केला.