Cricket News

आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक जास्त वेळा पराभूत झालेले संघ,RCB आणि मुंबई इंडियन्स या स्थानी.

 

भारतीय क्रिकेट इतिहासात सर्वात मोठे बदल T20. सामन्यांमुळे झाले आहेत. तसेच आयपीएल चा फायदा हा भारतीय युवा खेळाडूंना तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आहे हे आपल्याला माहीतच आहे. देशाचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी आपल्या देशातून सर्वाधिक जास्त पसंती क्रिकेट खेळाला मिळत आहे. अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे.

 

Cricket 16

 

T20 सामन्यांचे खास वैशिष्ट मध्ये आपल्याला आक्रमक फलंदाजी तसेच उत्कृष्ठ गोलंदाजी पाहायला मिळते म्हणून आपल्या देशात तरुणांमध्ये IPL ची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या संघांबद्दल सांगणार आहे जे आयपीएल सामन्यात सर्वात जास्त वेळा हरले आहेत.

 

1) दिल्ली कॅपिटल:-

आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक हार दिल्ली कॅपिटल या संघाला मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल या संघाने आयपीएल मध्ये 238 सामने खेळले आहेत त्यामधील 127 सामन्यात दिल्ली कॅपिटल या संघाला परभुताचा सामना करावा लागला आहे. गेल्या 14 वर्षापासून दिल्ली कॅपिटल संघाला एकदा सुद्धा चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळाली नाही.

 

2) किंग पंजाब:-

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने हारण्याच्या बाबतीत पंजाब किंग्ज हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने 232 सामने खेळले आहेत, त्यापैकी 124 सामने हारले आहेत. पंजाब किंग्ज संघानेही अद्याप अजून एक सुद्धा आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही.

 

3) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर:-

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने परभुताच्या बाबतीत RCB हा संघ तिसऱ्या स्थानी आहे. आरसीबी संघाने आजवर आयपीएल मध्ये 120 सामने गमावले आहेत. संघाने 241 सामने खेळले असून 121 सामने जिंकले आहेत.

 

 

4)कोलकाता नाईट रायडर्स:-

हा संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यात हार झालेल्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आजपर्यंत आयपीएल मध्ये 114 सामने गमावले आहेत. या संघाने 237 सामने खेळले असून त्यापैकी अवघे 119 सामने जिकण्यात यश आले आहे.

 

5)मुंबई इंडियन्स:-

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स संघाने 105 सामने पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे. मुंबईने आयपीएलमध्ये एकूण 247 सामने खेळले आहेत.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

हे ही वाचा:- IPL T20 : मैदानात धुवाधार षटकारांचा पाऊस पडणारे फलंदाज आहेत तरी कोण, भारतातील या फलंदाजाचा समावेश.

 

हे ही वाचा:- .IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघाचे नाव बदलणार, आता या नवीन अवतारात दिसेल RCB टीम.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button