भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी आपल्या देशात सर्वात जास्त लोक क्रिकेट खेळाचे फॅन आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड हे सर्वाधिक आहे. क्रिकेट क्षेत्रात आपल्या देशाने मोठे स्थान प्राप्त केले आहे.

आपल्या देशात असे अनेक खेळाडू आहेत जे जगप्रसिद्ध आहेत यामध्ये सचिन तेंडुलकर सुरेश रैना जडेजा महेंद्रसिंह धोनी कपिल देव असे अनेक दिग्गज खेळाडू आपल्या देशात आहेत.
क्रिकेटर आणि बॉलिवूड मधील लोकांचे जीवन ते खूप लक्सरी असते. सामान्य लोकांपेक्षा यांचे जीवन आणि राहणीमान हे यात मोठा बदल दिसून येतो.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्या संपत्ती बद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.
भारतीय क्रिकेट संघाचे 1983 साली कपिल देव हे कॅप्टन होते. कपिल देव मुळे भारताला 1983 साली वर्ल्ड कप जिंकून दिला. वर्ल्ड कप जिंकणे भारतासाठी अत्यंत अवघड होते परंतु कपिल देव यांनी आपल्या संघातील खेळाडूंचे साहस वाढवले त्यामुळे वर्ल्ड कप जिंकणे शक्य झाले. तेव्हापासून कपिल देव यांचे नाव सर्वात मोटिवेटर खेळाडू मध्ये येते.
कपिल देव यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकापेक्षा एक असे मोठे पराक्रम केले आहेत. आजही कपिल देव यांचे असे अनेक विक्रम मोडणे खूप कठीण आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी 90 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सुद्धा भूषवले. आता त्याच्याकडे समालोचक म्हणून पाहिले जाते. फिल्मी दुनियेतही त्यांनी हात आजमावला. कपिल देव वर बायोपिक चित्रपट सुद्धा बनला आहे.
कपिल देव च्या संपत्ती बद्दल सांगायचे झाले तर कपिल देव ची नेट वर्थ ही 30 मिलियन डॉलर आणि 220 करोड रुपये एवढी आहे. तसेच हा सर्व पैसा त्यांनी क्रिकेट आणि उद्योग क्षेत्रातून कमवला आहे.
तसेच कॉमेंट्री करूनही तो भरपूर पैसे कमावतो आणि अनेक माध्यम वाहिन्यांशीही संबंधित आहे. तो अनेक शाखांचा प्रचार करत आहे. यासोबतच तो हॉटेल चेनचा मालक सुद्धा आहे. अश्या अनेक विविध मार्गे कपिल देव हा पैसा कमवत आहे.
तसेच क्रिकेट क्षेत्रात अविश्वसनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, क्रिकेटर ऑफ द इयर, पद्मभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.