कपिल देव-सय्यद किरमाणी यांचा 1983 साली रचलेला विक्रम अखेर 40 वर्षाने या खेळाडूने मोडला.

 

कपिल देव: आयसीसी विश्वचषक 2023 मधील 19व्या सामन्यात लखनऊच्या मैदानावर श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला या सामन्यात नेदरलँड संघाचा आणखीन एक पराक्रम पाहायला मिळाला. 1983 मध्ये कपिल देव आणि सय्यद किरमानी यांनी केलेला विक्रम 40 वर्षांनी मोडीत काढला. नेदरलँड चा फलंदाज सायब्रेड अँगल ब्रेकट आणि लोगन वॅ!न बीक यांनी सातव्या गड्यासाठी 130 धावांची विक्रमी भागीदारी रचत हा विक्रम मोडीत काढला.

'या' भारतीय खेळाडूने पहिल्यांदा वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकून फॅन्सला दिले होते मोठे गिफ्ट!

कपिल देव आणि किरमाणी यांनी केलेला सातव्या गडीसाठीचा 126 धावांचा आज विक्रम केला होता. तो आज मोडीत काढला. 18 जून 1983 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा झिंबाब्वे विरुद्ध सामना सुरू होता. या सामन्यात भारताचे पाच गडी अवघ्या नऊ धावांवर बाद झाले होते. तेव्हा चॅम्पियन खेळाडू कपिल देव आणि यष्टीरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी यांनी सातव्या विकेटसाठी 126 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती.

या सामन्यात कर्णधार कपिल देव यांनी 175 धावांची ऐतिहासिक शतकी खेळी केली होती. तर रॉजर बिन्नी यांनी 22 आणि सय्यद किरमाणी यांनी 24 धावांचे योगदान दिले होते. भारताने 60 षटकात सर्व बाद 266 धावा केल्या होत्या. अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

नेदरलँड चा फलंदाज सायब्रेड अँगल ब्रेकट आणि लोगन वॅ!न बीक यांनी सातव्या गड्यासाठी 130 धावांची विक्रमी भागीदारी रचली. सायब्रेड याने 82 चेंडूत 70 धावांची खेळी केले यात चार चौकार आणि एका षटकारांचा समावेश होता. त्याला लोगनने भरपूर साथ दिली. त्याने 75 चेंडूत 59 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. यात एक चौकार आणि एक षटकारांचा समावेश होता. नेदरलँडकडून कोणत्याही विकेटसाठी ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली.

कपिल देव-सय्यद किरमाणी यांचा 1983 साली रचलेला विक्रम अखेर 40 वर्षाने या खेळाडूने मोडला.

सामन्याच्या सुरुवातीला नेदरलँड ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधाराचा हा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. 6 बाद 91 अशी नाजूक अवस्था झाली होती. सातव्या विकेटसाठी झालेल्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर नेदरलँड ने एक सन्मान जनक धावसंख्या उभारली. अखेर नेदरलँड ने 49.4 षटकात सर्वबाद 262 धावा केल्या.

श्रीलंकेकडून दिलशान मधुशंका याने 49 धावा देत चार गडी बाद केले तर रजिता याने 50 धावा चार महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. एम. तीक्षणा याने 44 धावात एकमेव गडी बाद केला. नेदरलँडने या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत सर्वांना चकित करून सोडले होते.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *