भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) संघाबाहेर करण्याची मागणी केली जात होती. मात्र त्याने जोरदार कमबॅक करत सर्वांची बोलती बंद केली आहे. तसेच २०२३ वर्षाची देखील त्याने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची तुलना सचिन तेंडुलकर सोबत होऊ लागली आहे. याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम केले. तसेच विराट कोहली देखील त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत एकापेक्षा एक मोठे विक्रम मोडत आहे. याबाबत बोलताना कपिल देव यांनी म्हटले आहे की, विराट आणि सचिन हे दोघेही वेगवेगळ्या काळातील क्रिकेटपटू आहेत. त्यांची तुलना होऊ शकत नाही.
माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी गल्फ न्यूजच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांपैकी एका खेळाडूची निवड करण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले की, “तुम्हाला अशा प्रकारची क्षमता असलेल्या एक किंवा दोन खेळाडूंची saनिवड करण्याची गरज नाही. हा ११ खेळाडूंचा संघ आहे. माझ्या आवडी निवडी वेगळ्या असू शकतात. आमच्या वेळी सुनील गावस्कर हे सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर,राहुल द्रविड सारखे खेळाडू आले. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली आहेत. येणाऱ्या काळात क्रिकेटपटू आणखी चांगली कामगिरी करताना दिसून येऊ शकतात.
विराट कोहली गेली ३ वर्ष चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत होता. मात्र त्याने आशिया चषक २०२२ स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने चांगली फलंदाजी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ४६ शतके झळकावली आहेत. तर सचिनच्या नावे ४९ शतकांची नोंद आहे. सचिनचा हा विक्रम तोडण्यासाठी त्याला ३ शतकांची गरज आहे.
हे ही वाचा..
धोनी अन् विराटला मागे सोडत रोहित शर्मा ठरलाय ‘बॉस’, ‘या’ बाबती केलाय वर्ल्ड रेकॉर्ड!
अखेर केएल राहुल झाला शेट्टी कुटुंबाचा जावई! लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल