6,6,6,4,6,2.. तात्या आजूनही मारतोय…! 35 वर्षाच्या किरोन पोलार्डने T20 लीगमध्ये घातला धुमाकूळ, केवळ इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक.. व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
सध्या अंतरराष्ट्रीय T20 लीग सुरु आहे. ज्यात किरोन पोलार्ड कर्णधार असलेल्या एमआई एमिरेट्स (mi emirates) आणि कॉलिन मुनरो (Colin Munro) कर्णधार असलेल्या डेजर्ट वाइपर्स (desert vipers) चा सामना खेळवला गेला. या सामन्यात MI चा कर्णधार किरोन पोलार्डने धडाकेबाज खेळी करून चाहत्यांची मने जिंकली आहेत.
डेझर्ट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एमआय संघाने प्रथम फलंदाजी करताना 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात डेझर्ट संघाने 21 चेंडू बाकी असताना तीन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. आणि सामना डेझर्टने जिंकला. मात्र सामना जरी पोलार्डच्या संघाच्या हातातून निसटला असला तरीसुद्धा पोलार्डची खेळी पाहून लोक त्याच्यावर चांगलेच खुश झाले आहेत.
किरॉन पोलार्डने ठोकले धडाकेबाज अर्धशतक!
एमआयने प्रथम फलंदाजी करताना त्यांच्या डावाची खराब सुरुवात केली मात्र नंतर कर्णधार पोलार्डने नोकोलस पुरणच्या मदतीने संघाचा दाव सावरला. निकोलस पुरणने 49 चेंडूत 57 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले.
त्याचवेळी किरॉन पोलार्डने 171 च्या स्ट्राईक रेटने 67 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यामुळे संघाने 5 विकेट गमावून 169 धावा केल्या. डेझर्ट संघाकडून टॉम करणने सर्वाधिक विकेट घेतल्या, त्याने दोन विकेट घेतल्या.
रदरफोर्डच्या खेळीने डेझर्ट संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
प्रत्युत्तरात डेझर्ट वायपर्स संघाकडून अॅलेक्स हेल्स आणि कर्णधार कॉलिन मुनरो यांनी शानदार खेळी केली. अॅलेक्सने 44 चेंडूत 62 धावा केल्या. त्याचवेळी कॉलिनने अवघ्या 22 चेंडूत 41 धावा केल्या. कॉलिन मुनरोने तीन षटकार आणि चार चौकार लगावले.
दुसरीकडे पाचव्या क्रमांकावर असलेल्या शेनफेन रदरफोर्डच्या अवघ्या 29 चेंडूत 56 धावांच्या खेळीने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संघाने अवघ्या 16.3 षटकांत 170/3 धावा केल्या. रदरफोर्डला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा किताब मिळाला.
एमआय एमिरेट्सकडून समित पटेलने दोन तर ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली. या सामन्यात टी-20 महान खेळाडू ड्वेन ब्रावो काही खास करू शकला नाही. जिथे त्याची फलंदाजी आली नाही तिथे त्याने तीन षटकात २४ धावा दिल्या तर एकही विकेट आपल्या नावावर करता आली नाही.
हेही वाचा..
दुसऱ्या टी -२० साठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हेन,’या’ २ खेळाडूंना मिळणार डच्चू
BCCI चा मोठा खुलासा! ईशान किशन, केएस भरत नव्हे तर कसोटी संघात ‘हा’ खेळाडू घेणार रिषभ पंतची जागा