5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाची धुरा असलेला पोलार्ड तात्या आज आयपीएलमधून निवृत्त झालाय..
आयपीएलमध्ये आजपर्यंत भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा केरीबियन खेळाडू ‘कायरोन पोलार्ड’ आयपीएलमधील सर्वात स्फोटक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी असो की फलंदाजी पोलार्ड मैदानावर असताना इतर खेळाडूकडे लक्ष प्रेक्षक कधीही देत नसत.
आयपीएल 2022 मात्र पोलार्डच्या कारकिर्दीतला शोभावे असं गेल. नाही. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ साठी त्याला संघात कायम केले. अंतर तो म्हणावी तशी कामगिरी त्या हंगामात करू शकला नाही. यामुळेच कि काय मुंबईचा संघ आयपीएल 2023 साठी पोलार्डला नारळ देणार , याची चर्चा सगळीकडे उठली.
View this post on Instagram
या चर्चेमुळेचं की काय अष्टपैलू खेळाडू पोलार्डने आता आपण आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केलंय. आयपिएल २०२३च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक फेनचायजी सध्या खेळाडू रिलीज करून नवीन खेळाडू घेण्याच्या तयारीत गुंतलीय. यादरम्यान मुंबई इंडियन्स पोलार्ड सह ईशान किशनला सुद्धा रिलीज करणार असल्याची पक्की माहिती सूत्राकडून बाहेर आली. आणि ती माहिती पोलार्डपर्यंत सुद्धा पोहोचली असावी. म्हणुनच की काय मुंबई इंडियन्सने रिलीज करत असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याआधीच पोलार्डने निवृत्ती जाहीर केलीय.
पोलार्डने आपल्या निवृत्तीच्या पोस्ट मध्ये म्हटल की, मुंबई इंडियन्स कडून इतके वर्ष सातत्याने खेळणे, हे माज्यासाठी खरचं गौरवाची बाब आहे. गेल्या १२ वर्षात मुंबई इंडियन्सचा भाग म्हणून मला राहता आला याचा आनंद आजही आहे. यापुढेही आणखी काही वर्ष मुंबईकडून आयपीएल खेळण्याची इच्छा होती. अंतर फ्रेन्चायझीसोबत झालेल्या बोलण्यानंतर आपण मुंबईचा हिस्सा राहणार नाही हे कळले. मुंबई सोडून मी कोणत्याही दुसर्या संघाकडून खेळण्यासाठी माझी मानसिक तयारी नाही. म्हणूनच मी आयपीएल मधून निवृत्ती जाहीर करतोय. यापुढे मी आयपीएलमध्ये कोणत्याही संघाकडून खेळणार नाही.
“एमआयच्या सर्व सोबत्यांचे आणि चाहत्यांचे मनपूर्वक आभार,#दुनियाहिलादेंगे”

कायरोन पोलार्डच्या या पोस्टसह त्याने आपल्या चाहत्यांचे आणि मुंबई इंडियन्समधील सहकरी खेळाडूंचे आभार देखील मानलेत..
पोलार्डच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ,पोलार्डने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपिएलमध्ये पदार्पण केले होते.त्यानंतर तो ५ वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा हिस्सा बनला. त्याने अनेक सामन्यात एकहाती संघाला विजय मिळवून दिला होता. अत्यंत स्फोटक फलंदाजी करण्यात माहिती असलेल्या पोलार्डला गोलंदाजी करण्यास इतर संघांचे प्रमुख गोलंदाज सुद्धा घाबरत असत.
मुंबई इंडियन्स साठी पोलार्डने आतापर्यंत एकूण 211 सामने खेळलेत. या सामन्यात त्याने 147 च्या स्ट्राईक रेटने 3195 धावा काढल्यात. यासोबतच पोलार्डने मुंबई कडून गोलंदाजी करतांना 79 खेळाडूंना बाद सुद्धा केले आहे. पोलार्डसारखा दिग्गज खेळाडूची कमी मुंबई इंडियन्सला नक्कीच जाणवेल. मात्र वयानुसार प्रत्येक खेळाडूला एकना एक दिवस थांबावेच लागते, हेही तेवढेच खरे.
आपीएलमधून निवृत्ती जाहीर केली असली तरीही पोलार्ड आणखी काही वर्ष क्रिकेट खेळणार नाही. यामध्ये प्रामुख्याने तो इतर देशांच्या टी-२० लीग, बिग बेश, आणि काही टी-१० स्पर्धा खेळत राहणार असल्याचे त्याने म्हटले आहे. पोलार्डच्या पुढील कारकिर्दीसाठी त्याचे अभिनंदन. आणि आयपीएलच्या माध्यामातून इतके वर्ष आमचे खास मनोरंजन करण्यासाठी धान्यवाद..
हेही वाचा:
या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत…
या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..