पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर विरुद्ध मुल्तान सुलतान्स यांच्यातील प्लेऑफ सामना मुलतान सुलतान्सने जिंकला. मुलतानच्या विजयात किरॉन पोलार्डचा मोठा वाटा होता. या सामन्यात पोलार्डने जबरदस्त फलंदाजी करत विरोधी संघाचे हाल केले.
पोलार्डने या सामन्यात 57 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याने 6 जबरदस्त षटकार ठोकले. हॅरिस रौफच्या 145 स्पीड बाउन्सरवर किरॉन पोलार्डने षटकार ठोकला. त्याचा हा सिक्सर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

पोलार्डने जबरदस्त खेळी केली.
प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुलतानने 160 धावा केल्या, ज्यामध्ये पोलार्डचे महत्त्वाचे योगदान होते. किरॉन पोलार्डने 34 चेंडूत 56 धावांची जबरदस्त खेळी खेळली, ज्यात त्याने 1 शानदार चौकार आणि 6 जबरदस्त षटकार ठोकले. पोलार्डची फलंदाजी पाहून मैदानातील प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला होता. पोलार्ड फलंदाजी करतानाचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
मुलतानने हा सामना 84 धावांनी जिंकला
प्लेऑफ सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुलतान संघाने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 160 धावा केल्या. ज्यामध्ये पोलार्डने 56 आणि कर्णधार मोहम्मद रिझवानने 33 धावा केल्या, पण प्रत्युत्तरात लाहोर कलंदर संघाने शरणागती पत्करली.
Pollard, the beast vs Rauf & Shaheen. pic.twitter.com/LaePFvuMLe
— Johns. (@CricCrazyJohns) March 15, 2023
लाहोरने 14.3 षटकांत 10 गडी गमावून केवळ 76 धावा केल्या. अशाप्रकारे मुलतानने हा सामना 84 धावांनी जिंकून प्ले ऑफमध्ये शानदार एन्ट्री केली.
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…