Cricket News

विराटच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा..! बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यानंतर आता सचिन तेंडुलकरला ‘या’ बाबतीत ही सोडले मागे..

सचिन तेंडुलकर: विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. भारताचा या विश्वचषकातला हा चौथा विजय होता. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत विराट हा चांगल्याच फार्मात आहे. या शतकी खेळीसह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत केला आहे. तो आयसीसीने आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.

आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत या आधी सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर होता. काल गुरुवारी बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीला त्याच्या शतकी खेळा बद्दल मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात आले.

Virat kohali taking catch

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडूलकरचा हा विक्रम

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत T20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांमध्ये मिळून विराट कोहलीने 11 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला आहे तर सचिन तेंडुलकरने दहा वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावला आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर नंतर रोहित शर्मा याचा क्रमांक लागतो.

रोहित शर्मा ने त्याच्या कारकिर्दीत नऊ वेळा आयसीसीच्या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पाटकावला आहे. आयसीसी स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये युवराज सिंगचे देखील नाव आहे. तो देखील रोहित शर्मा प्रमाणे नऊ सामन्यात हा पुरस्कार पटकावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने चांगला खेळ केला होता. तो या स्पर्धेत दोनदा शतकाच्या जवळ पोहोचला होता, मात्र तो शतकी खेळी करण्यात अपयशी ठरला. यंदाच्या स्पर्धेत देखील त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 अफगाणिस्तान विरुद्ध 55 तर पाकिस्तान विरुद्ध 16 धावांची खेळी केली होती. कालच्या सामन्यात त्यांनी 97 चेंडूत 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. कालचे शतक त्याला पूर्ण करण्यासाठी फारच अवघड होते. मात्र विराटने ते शक्य करून दाखवले.

सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर ,बांगलादेशने भारतापुढे विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान विराट कोहलीच्या जबरदस्त शतकी खेळीच्या जोरावर 41.3 षटकात 261 धावात तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे.

सचिन तेंडुलकर

धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत हे पहिले शतक ठोकले आहे. तर विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचे हे दुसरे शतक ठरले. या विजयासह भारताचे गुणतालिकेत आठ अंक झाले असून भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा चार सामन्यापैकी हा तिसरा पराभव आहे. भारताचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 22 ऑक्टोंबर रोजी रविवारी होणार आहे. 


हेही वाचा:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button