केकेआरचा धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेल याने घडवला इतिहास; आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा बनला दुसरा विदेशी खेळाडू!

0
15
केकेआरचा धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेल याने घडवला इतिहास; आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा बनला दुसरा विदेशी खेळाडू!
ad

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने शुक्रवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगलुरु विरुद्धच्या सामन्यात नवा इतिहास घडवला. रसेलने आयपीएल मध्ये 2000 पेक्षा अधिक धावा आणि 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो दुसरा विदेशी खेळाडू ठरला. 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2014 मध्ये तो केकेआरच्या संघात सामील झाला. त्याने आयपीएलच्या 114 सामन्यात 2326 धावा आणि 100 विकेट घेतले आहेत.

आयपीएल मध्ये दोनदा मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा रसेल आरसीबी विरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात 29 धावा देत दोन गडी बाद केले यासह त्याने शंभर विकेट बाद करण्याचा पराक्रम देखील केला आणि या खास यादीत समाविष्ट झाला. केकेआर ने रसेल याला 2022 मध्ये झालेल्या लिलावात रिटर्न केले होते. रसेलने rcbच्या विरोधात कॅमरन ग्रीन आणि रजत पटीदार यांना बाद केले. बंगळूर कडून ग्रीन आणि विराट यांनी धडाकेबाज खेळी करत मोठी धावसंख्या करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. रसेलने ग्रीन याला बाद करत ही जोडी फोडली.

केकेआरचा धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेल याने घडवला इतिहास; आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा बनला दुसरा विदेशी खेळाडू!

रसेलने आयपीएल मध्ये 1000 धावा आणि 100 विकेट घेणारा जगातला पाचवा खेळाडू ठरला. या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा केकेआरचा सुनील नरेन आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स सीएसके आणि गुजरात लायन्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा ड्वेन ब्रावो, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल यांचा समावेश आहे. या यादीमध्ये रवींद्र जडेजा सर्वात पुढे आहे. त्याने 288 सामन्यात 2,724 धावा काढल्यात तसेच त्याच्या नावे 152 विकेट घेतल्याची नोंद आहे. जडेजा हा आयपीएलच्या इतिहासातला असा खेळाडू आहे, ज्याने 2000 पेक्षा अधिक धावा आणि शंभरहून अधिक बळी घेतले आहेत.

रसेल याला आरसीबी विरुद्धच्या सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. कारण केकेआरच्या टॉप फलंदाजांनी भरपूर धावा काढल्यामुळे त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. रसेलने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 25 चेंडू 64 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यात तीन चौकार आणि सात षटकार यांचा समावेश होता. रसेल मैदानात उतरला होता तेव्हा केकेआरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. मैदानात उतरताच त्याने आक्रमक फटकेबाजी करायला सुरुवात केली आणि अर्धशतकी खेळी करत केकेआरला एक मोठी धावसंख्या उभी करण्यास मदत केली. त्याच्या या जबरदस्ती खेळीच्या जोरावर केकेआर ने एक मोठा विजय मिळवला.

केकेआरचा धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेल याने घडवला इतिहास; आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा बनला दुसरा विदेशी खेळाडू!

केकेआरच्या संघाकडून खेळताना रसेलने आयपीएलमध्ये अनेक महत्त्वपूर्ण सामन्यात विजय मिळवून दिला आहे.  केकेआर सह तो जगभरातील इतर  व्यावसायिक t20 लीग मध्ये क्रिकेट खेळत असतो.

IPL मध्ये 1000 धावा आणि 100 बळी पूर्ण करणारे खेळाडू

 

खेळाडूचे नाव              सामने         धावा          विकेट

  • रवींद्र जडेजा                228          2724       152
  • सुनील नरेन                  164        1095        165
  • ड्वेन ब्राव्हो                   161         1560       183
  • अक्षर पटेल                   138         1454       113

आंद्रे रसेल                    114         2326       100


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…