Sports Feature

ना फिनिशर.. ना सामनाविनर खेळाडू.. तब्बल एवढे कोटी खर्च करूनही शाहरुखच्या केकेआरने खरेदी केलेत असे खेळाडू, संघातील खेळाडूंची यादी पाहताच येतंय हसू.

 

पुढील वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आयपीएल 2023 चा थरार पाहायला मिळणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लीग आयपीएलमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होतात. येथे खेळाडू चांगली कामगिरी करून आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात. आयपीएल महोत्सवापूर्वी, मिनी लिलाव काल म्हणजेच २३ डिसेंबर रोजी केरळमधील कोची येथे पार पडला.

या लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये युद्ध रंगले होते. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाबद्दल सांगणार आहोत.

या लिलावात आपल्या आवडत्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रेंचायझीने आक्रमक बोली लावली. कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात दणक्यात प्रवेश केला, या लिलावासाठी केकेआरला फक्त 7.05 कोटी रुपये मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kolkata Knight Riders (@kkriders)

केकेआरने यंदा पहिल्या फेरीत न विकलेले खेळाडू विकत घेतले. पण, दुसऱ्या फेरीत केकेआरने त्याचा आपल्या संघात समावेश केला आहे. त्यांनी शाकिबला 1 कोटी बेस प्राईसला, डेव्हिड वेसला 1.50 कोटी बेस प्राईसला, लिटन दासला 50 लाख बेस प्राईसला खरेदी केले. तर जगदीशन यांचा ९० लाख रुपयांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने लीलावाआधी हे खेळाडू कायम ठेवले होते.

आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, अनुकुल रॉय, लॉकी फर्ग्युसन, टिम साऊदी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, रहमानउल्ला गुरबाज आणि हर्षित राणा

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

केकेआर

वैभव अरोरा (रु. 60 लाख), एन जगदीशन (रु. 90 लाख), सुयश शर्मा (रु. 20 लाख), डेव्हिड वेस (रु. 1 कोटी), कुलवंत खेजरोलिया (रु. 20 लाख), लिटन दास (50 लाख), मनदीप सिंग (50 लाख) आणि शाकिब अल हसन (1.50 कोटी)

एकंदरीत संघातील खेळाडूंकडे पाहता कोलकत्ता संघाकडे दोन ते चार खेळाडू सोडला एकही चांगला खेळाडू दिसत नाहीये. संघाच्या प्लेईंग 11 कडे लक्ष देताच संघातील सामोतोलाची कमी साफ दिसून येतेय.गोलंदाजीचा भार सुद्धा युवा खेळाडूवर जास्त दिसतोय. म्हणूनच हा संघ यंदा आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो , हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

या 3 खेळाडूंच्या येण्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ दिसतोय परीपूर्ण.. यंदा ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्यानेच उतरणार मैदानावर, संघातील हा युवा खेळाडू तर सलग 5 शतक ठोकून आलाय, पहा यादी.

18 चौकार, 2कडक षटकार… टीम इंडियात मिळत नाही संधी म्हणून, अजिंक्य रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये दाखवली आपली ताकत. गोलंदाजांना फोडून काढत शतक ठोकलेच शिवाय नावावर केले हे मोठे विक्रम..

आयपीएलमध्ये आतापर्यंत या 5 खेळाडूंनी ठोकलेत सर्वांत जास्त षटकार, एकं तर षटकार ठोकून सामना जिंकवून देण्यास आहे माहीर..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button