- Advertisement -

IPL 2023:कोलकत्ता नाईट रायडर्स मोठ्या अडचणीत.. श्रेयस अय्यरच्या आयपीएल खेळण्याबाबत मोठी अपडेट्स आली समोर..

0 0

IPL 2023:कोलकत्ता नाईट रायडर्स मोठ्या अडचणीत.. श्रेयस अय्यरच्या आयपीएल खेळण्याबाबत मोठी अपडेट्स आली समोर..


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अहमदाबाद कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान, पाठदुखीमुळे श्रेयस अय्यरला स्कॅनसाठी नेण्यात आले. यानंतर अय्यरने कसोटी सामन्यातही भाग घेतला नाही. त्याचवेळी, आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीझनमध्ये श्रेयस अय्यरच्या खेळण्याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या फिटनेस अपडेटची वाट पाहत आहे आणि अय्यर आगामी हंगामात भाग घेऊ शकेल की नाही हे देखील त्यांना माहित नाही. त्याचवेळी, क्रिकबझच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला पुढील 10 दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, त्यानंतरच त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

यापूर्वी अहमदाबाद कसोटी सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या पाठीचे स्कॅनिंग करण्यात आले होते, त्यावेळी आलेले अहवाल चांगले नव्हते. या कारणास्तव, त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडावे लागले, जरी त्याच्या जागी भारतीय बोर्डाने बदली म्हणून कोणत्याही खेळाडूचे नाव जाहीर केले नाही.

कोलकाता नाईट रायडर्सला नवा कर्णधार घोषित करावा लागू शकतो.

श्रेयस अय्यरने मुंबईत परतल्यानंतर मणक्याचे तज्ज्ञ डॉ. अभय नेने यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी पुढील 10 दिवस फक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतरच  अय्यर संपूर्ण हंगाम खेळू शकेल का नाही? हे स्पष्ट होईल.

श्रेयस अय्यर आगामी मोसमात खेळू शकला नाही, तर कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी हा मोठा धक्का मानला जाईल. एकीकडे संघाला नवा कर्णधार  घोषित करावे लागेल, तर दुसरीकडे मधल्या फळीसाठी अय्यरची भूमिका चोख बजावू शकेल असा खेळाडू शोधावा लागेल.


हेही वाचा:

2023 चा वर्ल्डकप जिंकून मी निवृत्ती घेणार- इंग्लंडच्या या स्टार खेळाडूने केला मोठा खुलासा.. 

ऐन वर्ल्डकप मध्ये रिषभ पंत बनला संगीतकार, क्रिकेट सोडून आता करतोय ही कामे..

विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..

एकदिवशीय क्रिकेटच्या इतिहासात या 5 गोलंदाजानी एका स्प्लेलमध्ये दिल्यात सर्वाधिक धावा,दोन गोलंदाजांची टीआर झाली होती कुत्र्यागत धुलाई…

 

Leave A Reply

Your email address will not be published.