“माझ्या त्या निणर्यामुळे आम्ही आरसीबीला हरवले” सामना जिंकल्यानंतर नितीश राणाने केले अजब वक्तव्य धावा काढणाऱ्या खेळाडूला नाही तर स्वतःलाच दिले जिंकण्याचे श्रेय..
“माझ्या त्या निणर्यामुळे आम्ही आरसीबीला हरवले” सामना जिंकल्यानंतर नितीश राणाने केले अजब वक्तव्य धावा काढणाऱ्या खेळाडूला नाही तर स्वतःलाच दिले जिंकण्याचे श्रेय..
PL 2023 चा 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरच्या फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 200 धावा केल्या. त्याचवेळी, या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना आरसीबीचा संघ केवळ 179 धावा करू शकला आणि केकेआरने 21 धावांनी सामना जिंकला. या सामन्यातील विजयानंतर कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) याने आश्चर्यकारक विधान केले आहे.

नितीश राणा(Nitish Rana) ने सामना संपल्यानंतर केले धक्कादायक विधान..
गेल्या 4 सामन्यांमध्ये सलग पराभव स्वीकारणाऱ्या केकेआरने (KKR) चिन्नास्वामी येथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)चा पराभव केला. या सामन्यात केकेआरच्या सर्व खेळाडूंनी आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले. मग ती गोलंदाजी असो वा फलंदाजी. खेळाडूंनी आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. दुसरीकडे, या सामन्यातील विजयानंतर कर्णधार नितीश राणा(Nitish Rana) आपल्या संघाच्या खेळाडूच्या कामगिरीवर खूप खूश असल्याचे त्याने सामन्यानंतर बोलताना सांगितले.
“मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की, आपण तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली तर विजय आपलाच असेल. जेसन रॉय संघात आल्याने फरक पडला असून संघातील वातावरण पूर्णपणे सकारात्मक आहे. जोपर्यंत आम्ही जिंकत आहोत, तोपर्यंत मीही चांगला खेळत आहे.
दुसऱ्या डावात चेंडू अजिबात वळला नाही, तरीही आमच्या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली, रसेलनेही चांगली गोलंदाजी केली. सुयशचा (Suyash ) हा पहिलाच सीझन असला तरी तो शानदार खेळ दाखवत आहे. मी त्याला नेहमी सांगतो की, समोरच्या फलंदाजाचे नाव बघू नकोस, तर वरच्या बाजूला गोलंदाजी कर, तुला विकेट मिळेल.
या सामन्यातील विजयानंतर केकेआरला मागे वळून बघायला आवडणार नाही. कारण सलग 4 सामने गमावल्यानंतर हा विजय त्यांच्याच हाती आहे. या सामन्यातील विजयानंतर केकेआरने गुणतालिकेत वाढ केली आहे. हा सामना जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत सातवे स्थान पटकावले आहे.