KKR vs PBKS: काल (26एप्रिल) रोजी झालेल्या पंजाब किंग्ज आणि केकेआर (KKR vs PBKS) यांच्यातील सामन्यात एक नाही तर अनेक विक्रम झाले. या एका एका सामन्यात सर्वाधिक 42 षटकार मारले. पंजाब किंग्स संघाने सामन्यात 24 षटकार ठोकले, तर KKR संघाने सामन्यात 18 षटकार ठोकले.
KKR vs PBKS: दोन्ही संघाच्या सलामीवीरांनी ठोकले अर्धशतके..!
या सामन्यात केकेआरने 261 धावा केल्या असताना पंजाब संघाने 8 चेंडू बाकी असताना हे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात आणखी एक मजेशीर विक्रम झाला आहे. आयपीएलमध्ये प्रथमच दोन्ही संघांच्या सर्व सलामीवीर फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आहेत.
या सामन्यात सलामीच्या चारही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली आहे. आयपीएलच्या इतिहासात असा विक्रम यापूर्वी कधीही झाला नव्हता. केकेआरकडून फलंदाजी करताना सलामीवीर सुनील नारायण आणि फिल सोल्ड यांनी 138 धावांची भागीदारी केली.
ज्यात सुनील नारायणने ७१ धावांची खेळी केली. त्याने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. तर फिल सोल्डने 37 चेंडूत 75 धावांची खेळी केली. पंजाब किंग्जच्या सलामीवीरांबद्दल बोलायचे तर, दोन्ही सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये 93 धावा जोडल्या.
प्रभासिमरन रासिंगने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक केले तर त्याचा साथीदार जॉनी बेअरस्टो याने 22 चेंडूत 50 धावा केल्या. या सामन्यात बेअरस्टोने 48 चेंडूत 108 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 9 षटकार आणि 8 चौकार लगावले. बेअरस्टोला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.
केकेआरविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पंजाबचा संघ गुणतालिकेत 8व्या स्थानावर पोहोचला आहे. हा सामना जिंकल्यानंतर पंजाब संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. मात्र, पंजाबचा संघ भविष्यातील सामन्यांमध्ये ही कामगिरी कायम ठेवू शकतो का, हे पाहणे बाकी आहे.
- ====आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..