KKR vs RCB: IPL 2024 मधील 36 वा सामना KKR आणि RCB यांच्यात खेळला गेला. केकेआरने हा सामना एका धावेने जिंकला आहे. हा सामना जिंकण्यासाठी आरसीबीला शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती पण लॉकी फर्ग्युसनला शेवटच्या चेंडूवर केवळ एक धाव करता आली.
आता येथून आरसीबी संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. या मोसमात आरसीबीने 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने फक्त एकच सामना जिंकला आहे, तर 7 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
KKR vs RCB:आरसीबीचा एका धावेने पराभव झाला,प्लेओफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी ठरली पाहिलं टीम ..
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकात 6 गडी गमावून 222 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात आरसीबी संघ केवळ 221 धावाच करू शकला. या सामन्यात एकेकाळी आरसीबी खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, आरसीबी हा सामना सहज जिंकेल असे सर्वांना वाटत होते. मात्र अखेरच्या षटकात कोलकात्याच्या गोलंदाजांनी संघाला सामन्यात परत आणले.
या पराभवासह आरसीबी आता आयपीएल 2024 च्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीतीमधून बाहेर पडणारा आरसीबी पहिला संघ ठरला आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.