KKR vs RCB LIVE: अंपायरने आउट दिल्यामुळे भडकला विराट कोहली, थेट अंपायरसोबत मैदानात घातला वाद; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!

KKR vs RCB LIVE: अंपायरने आउट दिल्यामुळे भडकला विराट कोहली, थेट अंपायरसोबत मैदानात घातला वाद; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!

KKR vs RCB LIVE: आज, IPL 2024 च्या 36 व्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 222 धावा केल्या.

KKR vs RCB LIVE: अंपायरने आउट दिल्यामुळे भडकला विराट कोहली, थेट अंपायरसोबत मैदानात घातला वाद; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!

223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीसाठी विराट कोहलीने येताच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट झेलबाद झाला. कोहलीच्या आऊटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या आऊटमुळे कोहली स्वतः नाराज दिसत होता. अशा परिस्थितीत नियम काय सांगतो ते जाणून घेऊया.

KKR vs RCB LIVE: विराट क्रीजच्या बाहेर होता.

कोहलीने क्रीजमधून बाहेर येत राणाच्या उंच फुल टॉस बॉलला मारण्याचा प्रयत्न केला. मैदानावरील पंचांनी कोहलीला आऊट दिला. आणि विराटने या निर्णयाविरुद्ध थर्ड अंपायरकडे धाव घेतली. तिसऱ्या पंचांचा असा विश्वास होता की, विराट कोहली क्रीजच्या बाहेर आहे, त्यामुळे नो बॉलऐवजी तो योग्य चेंडू होता. तिसऱ्या पंचाच्या निर्णयानंतर विराट कोहली संतापला. यादरम्यान तो मैदानावरील पंचांशी वाद घालतानाही दिसला. यासाठी त्यांना शिक्षाही होऊ शकते.

KKR vs RCB LIVE: केवळ 18 धावा काढून बाद झाला विराट कोहली..!

या सामन्याती  कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 7 चेंडूत 18 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 2 षटकार मारले. हिरव्या जर्सीमध्ये विराट कोहलीची कामगिरी काही विशेष झाली नाही. गेल्या दोन मोसमात विराट कोहलीला हिरव्या जर्सीत खातेही उघडता आले नाही. आयपीएल 2024 मधील विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने 8 सामन्यात सुमारे 75 च्या सरासरीने 372 धावा केल्या आहेत. तो 17 व्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *