KKR vs SRH Playing 11: आज ट्रॉफीसाठी भिडणार दोन्ही संघ, असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू..

0
23
KKR vs SRH Playing 11: आज ट्रॉफीसाठी भिडणार दोन्ही संघ, असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू..
ad

KKR vs SRH Playing 11: कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद ( KKR vs SRH ) यांच्यात रविवारी (24 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल 2024 फायनलमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघ प्रदीर्घ कालावधीनंतर विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करतील. कोलकाता शेवटचा 2014 मध्ये चॅम्पियन झाला होता. तर २०१६ मध्ये सनरायझर्सने ट्रॉफीवर कब्जा केला होता. आता चेन्नईत कोणता संघ बाजी मारतो हे पाहायचे आहे.

KKR vs SRH : पहिल्या क़्वलिफ़ायर सामन्यात श्रेयस अय्यरने रचला इतिहास, केकेआरला अंतिम सामन्यात्चे पोहचवले नही तर नावावर केले हे मोठे विक्रम..!

KKR vs SRH: कोलकत्ताचे पारडे दिसतेय जड .

श्रेयस अय्यरच्या केकेआरने संपूर्ण हंगामात सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे आणि गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर होते. त्यानंतर क्वालिफायर-१ मध्ये सनरायझर्सविरुद्ध नेत्रदीपक विजय नोंदवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. अय्यर 2020 मध्ये फायनल खेळला आहे. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. अंतिम फेरीत त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. आता तो पराभव विसरण्यासाठी अय्यरला यावेळी विजेतेपद मिळवायचे आहे.

कमिन्सच्या संघाने आक्रमक वृत्ती स्वीकारली.

दुसरीकडे, पॅट कमिन्सने क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सवर शानदार विजय मिळवत एसआरएचला अंतिम फेरीत नेले. सनरायझर्सने नाइट रायडर्सविरुद्धच्या गेल्या पाच सामन्यांत फक्त एकदाच विजय मिळवला आहे. या मोसमात त्याने आक्रमक वृत्ती स्वीकारली आहे. आता कमिन्सचा संघ नाईट रायडर्सला रोखू शकतो की नाही हे पाहायचे आहे.

KR vs SRH Playing 11

कोणत्या संघाच्या प्लेइंग-11 मध्ये होणार बदल?

चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल. क्वालिफायर-2 मध्ये स्पिनर्सनी कमाल दाखवली होती. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ प्लेइंग-11 मध्ये जास्तीत जास्त फिरकीपटू ठेवतील. कोलकाता संघाकडे सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीसारखे दोन उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. त्याचवेळी सनरायझर्स संघात अभिषेक शर्मा आणि शाहबाज अहमदसारखे कमी अनुभवी फिरकीपटू आहेत.

या दोघांनी क्वालिफायर-२ मध्ये राजस्थानविरुद्ध धुव्वा उडवला होता. कमिन्स अंतिम फेरीत मयंक मार्कंडेला अतिरिक्त फिरकीपटू म्हणून मैदानात उतरवू शकतो. कोलकाता संघात बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. या सामन्यातही शाहबाज प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळू शकतो.

KKR vs SRH Playing 11: आज ट्रॉफीसाठी भिडणार दोन्ही संघ, असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू..

KKR vs SRH: दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11


सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे/जयदेव उनाडकट, टी नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा:

Viral Video: विराट कोहलीच्या डोळ्यामध्ये अश्रू तर दिनेश कार्तिकची विदाई, RRVSRCB सामन्यातील भावूक व्हिडीओ तुफान व्हायरल..

“विराट कोहलीला आयपीएल ट्रॉफी जिंकायची असेल तर..” या संघाकडून खेळून मिळवू शकतो ट्रॉफी; दिग्गाजाने दिला विराट कोहली कोहलीला सल्ला.!