KKR vs SRH : कोलकाता नाइट रायडर्स संघ आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. मंगळवारी अहमदाबादच्या स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध (KKR vs SRH)खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघ पूर्ण उत्साहात दिसत होता.
हैदराबादविरुद्ध गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने ब्लॉकबस्टर शो दाखवला. या विजयात कर्णधार श्रेयसचाच मोठा वाटा होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 24 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारले आणि 241.67 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 58 धावा केल्या. या विजयासह कर्णधार श्रेयस अय्यरने इतिहास रचला.
KKR vs SRH : श्रेयस अय्यरने एक मोठा विक्रम केला नावावर.
आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे, पण या विजयासह त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. दोन संघांना अंतिम फेरीत नेणारा श्रेयस अय्यर हा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.
श्रेयसने यापूर्वी २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत नेले होते. मात्र, त्यानंतर त्यांना अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. KKR हा दुसरा संघ आहे ज्याला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे.
KKR vs SRH : श्रेयस अय्यरशिवाय कोणताही कर्णधार हे करू शकला नाही
आजपर्यंत कोणत्याही कर्णधाराला हा पराक्रम करता आलेला नाही. श्रेयसने २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सशी संबंध तोडले. त्याने 2022 च्या मेगा लिलावात भाग घेतला आणि त्याला कर्णधार बनवण्यात आले. मात्र, दुखापतीमुळे त्याला आयपीएल 2023 ला मुकावे लागले होते. यानंतर, तो या मोसमात आला आणि कर्णधार असताना, केकेआरला केवळ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर नेले नाही तर फायनलचे तिकीटही मिळवले.
आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा आयपीएलमध्ये पोहोचलेल्या कर्णधारांबद्दल बोलायचे झाले तर, महेंद्रसिंग धोनीचे नाव आघाडीवर आहे. धोनी कर्णधार म्हणून 10 आयपीएल फायनल खेळला आहे. रोहित शर्माने 5 वेळा आणि गौतम गंभीरने दोनदा अशी कामगिरी केली आहे. दोनदा अंतिम फेरी गाठून श्रेयस अय्यर या एलिट यादीत सामील झाला आहे.
विशेष म्हणजे त्याचा गुरू गौतम गंभीर आहे. गंभीरने 6 वर्षांपूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्यात आले. संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत गंभीरने हा निर्णय घेतला होता. मात्र, गंभीर आणि श्रेयस आता एकाच टीमचे सदस्य आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.