भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल (KL rahul) आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) सोमवारी (२३ जानेवारी) विवाह बंधनात अडकले आहेत. हा विवाह सोहळा खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवर पार पडला. दोघेही विवाह बंधनात अडकल्यानंतर सुनील शेट्टी आणि अहान शेट्टीने बाहेर येऊन ही गोड बातमी दिली. गेल्या काही दिवसांपासून केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या विवाहाची चर्चा सुरू होती. आता हा सोहळा पार पडल्यानंतर दोघांचेही फॅन्स खुश झाले आहेत.
View this post on Instagram
या विवाह सोहळ्यात केएल राहुल आणि अथियाच्या कुटुंबातील सदस्यांसह अनेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी देखील हजेरी लावली होती. मीडिया कर्मचारीही तेथे पोहोचले होते, परंतु त्यांनाही लग्नाचे फोटो पोस्ट न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच कोणालाही मोबाईल फोनचा वापर करण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. हेच कारण आहे की, केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या विवाहाचा एकही फोटो समोर आला नाहीये.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाह सोहळा दुपारी २:३० वाजता पार पडला. तसेच अशी माहिती देखील समोर आली आहे की, आयपीएल स्पर्धेदरम्यान हे कपल ग्रँड रिसेप्शन पार्टी देऊ शकते. त्यावेळी बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू देखील हजेरी लावू शकतात.
हे ही वाचा..
एकाच षटकात ५५ धावा, आयपीएलला गुडबाय करणाऱ्या इंग्लिश फलंदाजाने ४८ बाऊंड्रीसह ठोकल्या ३५० धावा
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण